Kangana Ranaut Reaction On Aishwarya Rai esakal
मनोरंजन

Kangana Reaction On Aishwarya : 'ऐश्वर्या म्हणजे....!' कंगनाला राहवलं नाही, मनातलं गेली बोलून!

युगंधर ताजणे

Kangana Ranaut Reaction On Aishwarya Rai : कंगनाची एखादी पोस्ट म्हणजे कोणता ना कोणता वाद होणारच असे चित्र काही महिन्यांपासून रुढ झाले आहे. कंगना ही नेहमीच तिच्या पोस्टमुळे चर्चेत असणारी सेलिब्रेटी आहे. कंगनाला बोलण्यासाठी, परखडपणे व्यक्त होण्यासाठी कोणताही विषय पुरतो. यावेळी मात्र ती जरा वेगळ्या अँगलनं व्यक्त होताना दिसत आहे.

कंगनानं चक्क विश्वसुंदरी ऐश्वर्या रॉयचे कौतुक केले आहे. कंगनानं तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर ऐश्वर्या रॉयच्या पीएस १ या चित्रपटावर दिलेली प्रतिक्रिया त्यात तिचं केलेलं कौतुक हा चर्चेचा विषय होत आहे. त्या चित्रपटातील एका मुव्ही क्लिपचा व्हिडिओ कंगनानं शेयर केला आहे. त्यात पीएस १ मधील नंदिनी (ऐश्वर्या) ही कुंदवईशी (तृषा) संवाद साधताना दिसते.

Also Read - Adhik Shravan Maas : अधिक श्रावण मास चित्तशुद्धीचा पर्वकाळ

कंगनानं तो व्हिडिओ शेयर करुन विश्वसुंदरी ऐश्वर्याचं कौतुक केलं आहे. ती म्हणते, बॉलीवूडमधील गीतकारांनी सोळाव्या वर्षातील अभिनेत्रींच्या सौंदर्याविषयी खूप काही लिहिलं आहे. त्यावर गाणी रचली आहे. मात्र ४० आणि ५० व्या वर्षातील अभिनेत्रींविषयी फार कमी गाणी आपल्याकडे आहे. त्याचे एक कारण या वयातील अभिनेत्री सेन्शुलिटी, सेक्शुलिटी आणि सिडक्शनचे सादरीकरण करण्यात कमी पडतात. असे त्यांना वाटते.

मात्र यासगळ्याला ऐश्वर्या रॉय यासगळ्याला अपवाद आहे. तिचं सौंदर्य हे तुम्हाला भुरळ घालणारं आहे. ती केवळ सुंदरच नाही तर स्मार्ट आहे. चतूर आहे. याचे बेस्ट कॉम्बिनेशन म्हणून तिच्याकडे पाहावे लागेल. तिच्या या सगळ्या गुणांसाठी मी तिला दोन फुल मून देईन. अशा शब्दांत कंगनानं ऐश्वर्याची स्तुती केली आहे. तिच्या त्या पोस्टवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

ऐश्वर्याच्या सौंदर्याचे लाखो चाहते आहेत. तिच्या फोटोंना आणि व्हिडिओंना मिळणारा प्रतिसादही मोठा आहे. केवळ भारतातच नाहीतर जगभरामध्ये ऐश्वर्यावर होणारा कौतुकाचा वर्षाव मोठा आहे. यात बॉलीवूडची क्वीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कंगनानं ऐश्वर्याची केलेली स्तूती चर्चेत आली आहे. ऐश्वर्यानं पीएस १ मध्ये जो लूक केला होता त्यावर चाहते फिदा झाले होते. त्यातील तिच्या अभियनाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.

कंगनानं ऐश्वर्याचं केलेलं कौतुक चाह्यांच्या चर्चेचा विषय आहे. आपल्या प्रतिक्रियेमध्ये कंगना म्हणते की, ऐश्वर्याच्या सौंदर्याविषयी काय बोलावं, वयाच्या ५० मध्ये देखील ती कमालीची सुंदर दिसते. तिचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. तुम्ही तिच्या सौंदर्याला चँलेंज करु शकत नाही. अशा शब्दांत कंगनानं तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

कंगनाच्या आगामी प्रोजेक्टविषयी सांगायचे झाल्यास ती सध्या भारताच्या पहिला महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या इमर्जन्सी नावाच्या बायोपिकमध्ये व्यस्त आहे. काही महिन्यांपूर्वी त्याच्या व्हायरल झालेल्या टीझरला प्रेक्षकांचा, चाहत्यांचा तुफान प्रतिसाद मिळाला होता. त्यात कंगनाच्या लूक्सचे आणि अभिनयाचे प्रेक्षकांनी कौतुक केले होते.

याशिवाय कंगना तेजस, चंद्रमुखी २ मध्ये देखील दिसणार आहे. तिचा तेजस नावाचा चित्रपट २० ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. तसेच चंद्रमुखी २ हा १९ सप्टेंबर तर बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित इमर्जन्सी नावाचा चित्रपट २४ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT