मुंबई - बॉलीवूडची रणरागिनी अशी प्रतिमा झालेल्या कंगणाचा दिवस रोज एका नव्या वादग्रस्त विधानाने सुरु होतो. यामुळे ती सध्या भलत्याच फॉर्ममध्ये आहे. तिच्या त्या विधानांवर सोशन मीडियातून प्रचंड टीका होते. मात्र यासगळयाचे कंगणाला काही देणे घेणे नाही. ती आपल्या मतांवर ठाम असल्याचे सांगते. आपल्या क्षेत्रात जी अनागोंदी वाढत आहे त्याला सगळ्यांसमोर आणणे यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचेही तिचे म्हणणे आहे. आता कंगणा पुन्हा तिच्या एका नव्या टिव्टमुळे वादात सापडली आहे.
हिंदी चित्रपटसृष्टीसाठी जो बॉलीवूड शब्द वापरला गेला आहे त्याविरोधात कंगणाने भूमिका घेतली आहे. यासाठी तिने एक नवीन हॅशटॅग सुरु केला आहे. या बॉलीवूडमध्ये जे काय चालते ते जगासमोर आणण्यासाठी ती आक्रमक झाली आहे. बेजबाबदार बातम्या देणाऱ्या मीडिया हाऊसेस विरोधात शाहरुख, सलमान आणि आमिर खान यांच्या प्रॉडक्शन हाऊसेससह ३८ जणांनी कोर्टात धाव घेतली आहे. रिपब्लिक टीव्ही, टाइम्स नाऊ, अर्णब गोस्वामी, प्रदीप भंडारी, राहुल शिवशंकर, नविका कुमार यांच्या विरोधात काही बॉलिवूड कलाकारांनी एकत्र येऊन याचिका दाखल केली आहे. या कृतीवर अभिनेत्री कंगनाने राग व्यक्त केला. यावर तिने ट्विट करुन 'त्यात आता कळलं का संपूर्ण जगासमोर इभ्रतीचे वाभाडे निघाल्यावर कसं वाटतं?' असा सवाल याचिका दाखल करणा-यांना तिने विचारला होता.
कंगणाने India Reject Bollywood हॅशटॅग सुरु केला आहे. आपल्याला हा बॉलीवूड शब्दच आवडत नसल्याचे म्हटले आहे. हा शब्द अपमानकारक आहे. त्याचे समर्थन करणा-यांचा निषेध केला आहे. विशेष म्हणजे कंगणाच्या या नव्या मोहिमेला अनेकांचा पाठींबा मिळत आहे. बॉलीवूडमध्ये कलाकार आहेत आणि दलाल देखील तसेच याठिकाणी चित्रपट इंडस्ट्री आहे आणि बॉलीवूडही. ज्या मोठ्या दिमाखात आपण बॉलीवूड असे म्हणतो तो शब्दही हॉलीवूड यावरुन चोरला आहे. यापूर्वीही कंगणाने सोशल मीडियावर नेपोटिझम आणि मूव्ही माफिया या नावाने हॅशटॅग सुरु केले होते. त्यालाही नेटक-यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता.
India Reject Bollywood हा नव्याने सुरु केलेला हॅशटॅग किती यशस्वी होतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. कंगणाने सध्या तिच्या थलाईवी या चित्रपटाचे चित्रिकरण पूर्ण केले आहे. ती आता आपल्या मनाली येथील घरी आहे. याशिवाय तिच्या तेजस और धाकड नावाचा चित्रपटाची तयारीही सुरु आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.