कंगना रनौत (Kangana Ranaut) म्हणजे वायफळ,बेताल बोलून वादाची मालिका चालवणारी अभिनेत्री अशी सध्या तरी तिची ओळख बनली आहे. सोशल मीडियाही तिच्यामुळे हैरण झाला आणि काही काळापुरते त्यानं कंगनावर बंदी आणली. खरंतर,बाईंमध्ये अभिनय गुणही चांगले आहेत पण त्याच्यामुळे चर्चेत राहण्यापेक्षा ती वादांनीच चर्चेत राहिली. गेले काही दिवस ती शांत आहे,सुधारली वाटतं असं वाटत असतानाच आता पुन्हा तिनं साऊथ सुपरस्टार्सना सावधानतेचा इशारा दिला आहे.बरं हिच्याकडे कुणी मदत मागितली नसताना हिला सल्ले द्यायची मोठी हौस आहे हे आपल्याला माहितीच आहे. त्याचं झालं असं की,कंगनानं नुकतंच 'पुष्पा' या दाक्षिणात्य सिनेमाविषयी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 'पुष्पा' सिनेमा आणि त्या अनुषंगाने बॉलीवूडवर केलेल्या भाष्यामुळे तिची चर्चा सुरू आहे. दाक्षिणात्य सिनेमा बॉलीवूडच्या तुलनेत अधिक का गाजतायत याबद्दल तिनं वक्तव्य केलं आहे. बॉलीवूडचा दर्जा का घसरत आहे याविषयीची कारणंही तिनं सांगितली आहेत.
कंगना रणौतने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातनं आपली मतं व्यक्त केली आहेत. या स्टोरीत तिनं 'पुष्पा' आणि 'KGF2' या दोन सिनेमांचा फोटो कोलाज केला आहे. तिनं सिनेमातील कलाकारांचं मनापासून कौतूक केलंय. त्याचबरोबर दाक्षिणात्य सिनेमा लोकप्रिय होण्यामागचं कारणही सांगितलं आहे.ती म्हणालीय,''दाक्षिणात्य सिनेमांचे निर्माते भारतीय सभ्यता,संस्कृतीशी जोडलेले असतात. ते आपल्या कुटुंबावर फार प्रेम करतात आणि ते पारंपरिक आहेत,पाश्चिमात्य संस्कृतीला ते बळी पडलेले नाहीत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते आपल्या कामाप्रती एकनिष्ठ आहेत,ते पक्के व्यावसायिक,व्यवहारिक आहेत. त्यांच्यातील काम करण्याची इच्छाशकती वाखाणण्याजोगी आहे''. इतकं छान-छान दाक्षिणात्य सिनेसृष्टीविषयी बोललल्यावर तिनं मात्र तिच्याकडे न मागता एक सल्ला दिलेला आहे. तिनं म्हटलंय,''दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील मंडळींनी बॉलीवूडमुळे आपण भ्रष्ट होणार नाही न,याची काळजी मात्र घ्यावी''. आता कंगनाला असं बोलायचं काहीच कारण नव्हतं जेव्हा ती स्वतः एक बॉलीवूडकर आहे. पण डोकं न वापरता बोलणाऱ्या कंगनाला हे कोण समजावणार.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.