kangana ranaut, javed akhtar, kangana ranaut news, javed akhtar news, Javed Akhtar on Kangana Ranaut News SAKAL
मनोरंजन

Kangana Ranaut Javed Akhtar Dispute: कंगना राणौतला कोर्टाचा दणका! जावेद अख्तर याच्याबाबतचा खटला फेटाळला...

Vaishali Patil

Javed Akhatr-Kangana Ranaut:  गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत आणि लेखक-गीतकार जावेद अख्तर यांच्या प्रकरणाची जोरदार चर्चा होती.

आता जावेद अख्तर यांच्यासोबतच्या कायदेशीर लढाईत कंगना राणौतला कोर्टानं मोठा दणका दिला आहे. मुंबईच्या दंडाधिकारी न्यायालयाने जावेद अख्तर यांच्यावर लावण्यात आलेले चार आरोप फेटाळले तर दोन आरोपांबाबत समन्स पाठवले आहे.

कंगनाने जावेद अख्तर यांच्यावर अनेक आरोप केले होते. ज्यावेळी कंगना आणि हृतिक रोशन यांच्यात वाद झाला होता त्यावेळी त्यांनी कंगनाला आणि तिची बहीण रंगोली चंदेलला जावेद यांनी आपल्या घरी बोलावून हृतिक रोशनची माफी मागायला सांगितली होती.

न्यायालयाने म्हटले की, गीतकार जावेद अख्तर यांच्यावर खंडणीचा कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. मुंबई मॅजिस्ट्रेट कोर्टाने असेही म्हटले आहे की एखाद्या व्यक्तीला लेखी माफी मागायला सांगणं हे कायद्या अंतर्गत येत नाही कारण कायदेशीर हक्क तयार, विस्तार किंवा सोयीच्या मार्गाने हस्तांतरित केला जाऊ शकत नाही.

कंगनाने आरोप केला होता की जावेद अख्तर यांनी तिला धमकावले आणि बळजबरीने हृतिक रोशनची माफी मागण्यास सांगितले. त्याचबरोबर तिने जावेद यांच्यावर खोटे आणि निराधार वक्तव्य करून तिची प्रतिमा खराब केल्याचा आरोप केला.

तिच्या नैतिक चारित्र्यावर घाला घालणे, तिची प्रतिष्ठा आणि पावित्र्य दुखावल्याचा आरोप केला आहे. इतकच नाही तर त्यांनी जाणुन बजून जाणूनबुजून तिच्या नम्रतेचा अपमान आणि वैयक्तिक संबंधांवर टिप्पणी केली आहे. तर जावेद अख्तर यांनी कंगना राणौतविरोधात मानहानीची तक्रार दाखल केली होती.

मंगळवारी दंडाधिकारी आरएम शेख यांनी सर्व युक्तिवाद आणि सबमिशन विचारात घेतल्यानंतर निर्णय दिला. कंगना राणौतने केलेल्या सहा आरोपांपैकी फक्त दोन आरोपांवरच ते कारवाई करणार असल्याचं सांगितलं.

या दोन आरोपात जावेद अख्तर यांना धमकावणे आणि महिलेच्या विनयशीलतेचा अपमान केल्याच्या आरोपाखाली समन्स जारी केले. आता जावेद अख्तर यांना 5 ऑगस्ट रोजी अंधेरी न्यायालयात हजर रहावे लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूरांचा गड कोसळला; पालघर जिल्ह्यात महायुतीचा दबदबा वाढला

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सचिन पाटील 13327 मतांनी आघाडीवर

Satara-Jawali Assembly Election 2024 Results : साताऱ्यात भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले 1 लाख 40 हजार 120 मतांनी विजयी; राज्यात रेकॉर्डब्रेक मताधिक्य

Ambegaon Assembly Election 2024 result live: दिलीप वळसे-पाटील आठव्यांदा आमदार होणार; शिष्य देवदत्त निकम पराभूत

Maharashtra Election 2024: प्रविण दरेकरांचा 'तो' दावा खरा ठरला! राज्यात महायुतीचेच सरकार येणार

SCROLL FOR NEXT