Kangana Ranaut Lock upp 2 Update Instagram
मनोरंजन

Kangana Ranaut Lock upp 2: आता ओटीटी वर नाही तर 'या' वाहिनीवर प्रसारित होणार कंगनाचा 'लॉकअप 2', समोर आली रीलिज डेट

कंगनाच्या 'लॉकअप' शो चा पहिला सीझन बोल्ड कंटेटमुळे भलताच गाजला होता.

प्रणाली मोरे

Kangana Ranaut Lock upp 2 Update: कंगना रनौतनं होस्ट केलेला रिअॅलिटी शो 'लॉकअप'चा मागील सीझन खूपच यशस्वी राहिला. शो मध्ये एकापेक्षा एक खुलासे झालेले आपण सर्वांनीच पाहिले असतील आणि एकता कपूरच्या प्रॉडक्शन अंतर्गत बनलेल्या या शो चा पहिला विनर ठरला होता मुनव्वर फारुकी.

शो चा दुसरा सीझन यावर्षी येणार आहे आणि बातमी आहे की या महिन्यातच दुसऱ्या सीझनची सुरुवात होणार आहे. या शो ची प्रीमियर डेट देखील समोर आली आहे.

टेलीचक्करच्या रिपोर्टनुसार 'लॉकअप' शो चा दुसरा सीझन १७ एप्रिलला सुरु होणार आहे. बातमी आहे की यावेळी हा शो Zee TV वर प्रसारित केला जाणार आहे. पण शो चा कंटेट खूपच बोल्ड असल्या कारणानं कदाचित सेन्सॉरची नजर त्यावर असेल. अनेक गोष्टी एडिट केल्या जातील. रिपोर्टनुसार शो चा हा सीझन गेल्या सीझनच्या तुलनेत खूप मोठा आणि अजून मसालेदार असेल.

शो च्या पहिल्या भागाच्या रिलीजनंतर लोकांनी याची तुलना बिग बॉस सोबत सुरु केली होती. ज्यानंतर निर्माती एकता कपूरनं सांगितलं होतं की जगभरात असे कितीतरी शोज आहेत जे तुरुंगवास..कैदी..अशा कन्सेप्टवर आधारित आहेत. हे सगळे शोज एकमेकांपेक्षा खूप वेगळे आहेत.

शोचा पहिला सीझन मुनव्वर आणि अंजलीच्या रिलेशनशीपमुळे खूप गाजला. करण कुंद्रा त्या सीझनचा जेलर बनल्यावर चर्चेत आला होता.

या शो च्या माध्यमातून कंगना रनौतनं OTT प्लॅटफॉर्मवर पदार्पण केलं होतं. पहिल्या सीझनमध्ये १७ सेलिब्रिटींना लॉकअपमध्ये बंद केलं होतं. शोला MX Player आणि ALT Balaji वर प्रसारित केलं गेलं होतं आणि लोक या शोला मोफत पाहू शकत होते कोणतंही सबस्क्रिप्शन घेतल्या शिवाय. आता पहायचं की यावेळी शो ला ओटीटी प्लॅटफॉर्मवर आणलं जाईल की टेलीव्हिजनवरच प्रसारित केली जाईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT