अभिनेत्री कंगना रनौतचा(Kangana Ranaut) 'लॉकअप'(Lockup) हा रिअॅलिटी शो अनेक गोष्टींमुळे सध्या अधनं-मधनं चर्चेत येत आहे. 'लॉकअप' मध्ये बंदिस्त असलेल्या स्पर्धकांमध्ये अनेक गोष्टींवरनं वाद रंगताना दिसत आहेत. आता पुन्हा एकदा कंगनाच्या 'लॉकअप'मध्ये स्पर्धकांमध्ये वाद रंगलेला दिसून आला. यावेळी हा वाद घर आणि किचन मधील कामावरनं झाला,ज्यानंतर पूनम पांडेनं(Poonam Pandey) इतर स्पर्धकांना 'बेशिस्त' म्हणून संबोधलं.
ओटीटी प्लॅटफॉर्मवर एमएक्स प्लेयरच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर 'लॉकअप' शो शी संबंधित एक प्रोमो रिलीज करण्यात आला आहे. या व्हिडीओत आपण पाहू शकतोय 'लॉकअप' मधील सदस्य एकमेकांशी घरातील कामांना घेऊन वाद घालत आहेत. त्याच व्हिडीओत पूनम पांडे म्हणताना दिसतेय,''मला नाही वाटत इथे कुणाला भांडी कशी स्वच्छ करतात हे माहित आहे? नुसता बेशिस्तपणा आहे''. यानंतर नीशा रावलही मुन्नवर फारुकी सोबत किचनमधील कामावरनं चर्चा करताना या प्रोमोमध्ये दिसत आहे. ज्यानंतर मुन्नवर तिला 'स्टुपीड' म्हणताना दिसतोय. यावर नीशा त्याच्यावर चिडतानाही दिसत आहे. तर व्हिडीओत पुढे सारा खान आणि पायल रोहतगीमध्ये पाण्यावरनं देखील खटके उडताना दिसत आहेत. एक-एक करुन सगळेच किचनमधील कामांवरनं भांडायला लागल्यावर शेवटी किचनला टाळा लागलेला दिसतो.
सोशल मीडियावर 'लॉकअप' संदर्भातला हा व्हिडीओ रिलीज झाला ना झाला तोच व्हायरल झालाय. शो च्या प्रेक्षकांना व्हिडीओ चांगलाच आवडलेला दिसतोय. नेटकरी यावर प्रतिक्रिया देतानाही दिसत आहेत. लॉकअप शो सुरू झाल्यानंतर पहिला आठवडा खूपच धमाल गेला. कंगनानं जिथे काही स्पर्धकांना चांगलंच लेक्चर दिलं तिथे दुसरीकडे काही स्पर्धकांच्या आयुष्यातील दुःखभऱ्या कहाण्याही ऐकायला मिळाल्या. या शो मधनं पहिला स्पर्धक बाहेर पडलाय ज्याचं नाव आहे चक्रपाणी महाराज. आता १२ स्पर्धक लॉकअप मध्ये आहेत. शो मधनं बाहेर आल्यावर च्रक्रपाणी महाराजनी मीडियाला सांगितलं की,''त्यांना या शो चा फॉरमॅट कळाला नाही. त्यात मला एकटं राहायला आवडतं,इतक्या सगळ्या लोकांसोबत एकत्र राहणं माझ्यासाठी कठीणच होतं. त्यामुळे मला स्वतःची ओळख तिथे बनवता आली नाही आणि हेच कारण असेल की मी लगेच बाद झालो. तिथे लोक कॅमेऱ्याशी बोलतात,कॅमेऱ्यासमोर दिसण्यासाठी भांडतात. मला मात्र तिथे राहताना नेहमीच आश्चर्य वाटायचं की कुणी खरंच आम्हाला पाहत आहे की नाही''. असो,आता किचनला लॉक लागल्यामुळे स्पर्धकांची मात्र उपासमार होणार आहे. आणि यापेक्षा कठीण शिक्षा काय असू शकते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.