कंगनानं(Kangana Ranaut) तिच्या नव्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये आलिया(Alia Bhatt)चं 'गंगूबाई काठियावाडी'(Gangubai Kathiawadi) सिनेमासाठी भरभरून कौतूक करताना थेट तिला 'Big Hero' म्हणून संबोधलं आहे. इतकंच नाही तर कंगनानं संजय लीला भन्सली यांना देखील 'सुपरस्टार डायरेक्टर' म्हटलं आहे. पण याच कंगनानं काही दिवसांपूर्वी आलियाच्या 'गंगूबाई काठियावाडी' सिनेमासंदर्भात एक पोस्ट केली होती, ज्यात तिनं 'कलाकार निवडण्यात मोठी चूक केलीय' असं म्हटलं होतं.
कंगनानं तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर लिहिलं आहे,''खूप मस्त वाटतंय जेव्हा दाक्षिणात्य सिनेमे बॉक्सऑफिस कलेक्शनला पुन्हा तेजीचे दिवस आणत आहेत. आपल्या हिंदी सिनेमांनी देखील यात खारीचा वाटा उचलला आहे. 'गंगूबाई काठियावाडी' हा महिलाप्रधान सिनेमा असला तरी त्यात हिरोची उणीव भासत नाही,एक महिलाच हिरोचं काम करुन गेली आहे असं म्हणताना तिनं आलियाला 'Big Hero' म्हणत संजय लीला भन्सालींच्या दिग्दर्शनाचं कौतूक केलं आहे. पण ''सध्या व्हेंटिलेटरवर असणाऱ्या थिएटर्सना वाचवण्यासाठी या हिंदी सिनेमाची मोठी मदत होईल'' असंही तिनं नमूद केलं आहे.
कंगना अनेकदा बेताल असं बोलून जाते. आणि मग वाद सुरू होतात. 'गंगूबाई काठियावाडी' सिनेमावरुन तिनं आलियाला डिवचणारी पोस्ट केली होती. ज्याच तिनं महेश भट्ट यांना 'मूव्ही माफिया' आणि आलिया भट्टला 'पापा की परी' असं नाव न घेता संबोधलं होतं. 'गंगूबाई..' शुक्रवारी प्रदर्शित होण्याआधी केलेल्या त्या पोस्टमध्ये तिनं लिहिलं होतं,''या शुक्रवारी २०० कोटींची राख होणार आहे बॉक्सऑफिसवर...कारण पप्पाला( Movie Mafia) दाखवायचंय माझी मुलगी(papa ki pari) अभिनय करू शकते''. गंगूबाई सिनेमातली मोठी चूक म्हणजे चुकीच्या कलाकारांची निवड. ही लोकं कधीच सुधारणार नाहीत. थिएटर्सच्या स्क्रीन दाक्षिणात्य आणि हॉलीवूडपटांना मिळू लागल्या आहेत यात काहीच आश्चर्य करायला नको. बॉलीवूड असाच मूव्ही माफियांमुळे भरडला जाणार''. कंगनाच्या या पोस्टवर आलियानं मात्र शांत राहून उत्तर दिलं होतं की,''मी अशा नकारात्मक विचारांचा विचार करीत नाही. असे विचार ऐकले की भावनाशून्य बनते''.असो,'गंगूबाई..' पाहण्याआधी उगाचच कुणीही काही नं विचारता बरळणारी कंगना 'गंगूबाई..' पाहिल्यावर आलिया,संजय लीला भन्सालीचं कौतूक करते म्हटल्यावर सगळ्यांच्या भूवया उंचावल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.