Kangana Ranaut reation on salman rushdie attack: भारतीय वंशाचे वादग्रस्त ब्रिटिश लेखक सलमान रुश्दी यांच्यावर न्यूयॉर्क मध्ये जीवघेणा हल्ला झाला. ते एका साहित्यविषयक कार्यक्रमात गेले होते,तेव्हा स्टेजवर येऊन हल्लेखोरानं त्यांच्या मानेवर चाकूनं हल्ला केला. त्यानंतर पेंसिलवेनिया च्या एका रुग्णालयात सलमान रुश्दी (salman rushdie) यांना दाखल करण्यात आले. जिथे त्यांच्यावर सर्जरी झाली. सलमान रुश्दींवर झालेल्या हल्ल्याप्रकरणात जगभरातून निषेध व्यक्त केला जात आहे. अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींनी यावर प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. बॉलीवूड अभिनेत्री कंगान रनौतने(Kangana Ranaut) या जीवघेण्या हल्ल्यावर(attack) संताप व्यक्त केला आहे. तिनं सोशल मीडियावर या संदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे.(Kangana Ranaut reation on salman rushdie attack in newyork)
कंगनानं आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीत एक लेख शेअर करत लिहिलं आहे, ''या जिहादींनी(कट्टरपंथियांनी) आणखी एक भयानक कृत्य घडवून आणलं. 'द सटॅनिक वर्सेज' आपल्या काळातील दर्जेदार पुस्तकांपैकी एक आहे, माझ्याकडे शब्द नाहीत,मी स्तब्ध झाले आहे''.
अभिनेत्री स्वरा भास्कर हिनं देखील सलमान रुश्दी यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध जाहीर केला आहे. तिनं ट्वीट करत लिहिलं आहे- ''सलमान रुश्दी यांच्यासाठी मी प्रार्थना करते. हे खूपच लाजिरवाणं आणि भ्याडपणाचं कृत्य आहे''.
कंगना आणि स्वरा व्यतिरिक्त गीतकार जावेद अख्तर यांनी देखील ट्वीट करत आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. त्यांनी लिहिलं आहेज- ''काही कट्टरपंथीयांनी सलमान रुश्दी यांच्यावर केलेल्या हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो. मला खात्री आहे की न्यूयॉर्क पोलिस हल्लेखोरांच्या विरोधात कडक कारवाई करतील''.
सलमान रुश्दी यांना पहिल्यांदा जीवे मारण्याची धमकी त्यांचे वादग्रस्त पुस्तक 'द सनॅटिक वर्सेज' या पुस्तकामुळे ८० च्या दशकात मिळाली होती. ईराणमधून ही धमकी त्यांना देण्यात आली होती. १९८८ मध्ये ते पुस्तक ईराणमध्ये बॅन करण्यात आलं होतं. ईराणचे दिवंगत नेता अयातुल्ला रुहोल्लाह खुमैनी यांनी रुश्दी यांना जीवे मारण्याचा धार्मिक आदेश त्यावेळी जारी केला होता.
कंगनाच्या सिनेमांविषयी बोलायचं झालं तर ती सध्या 'इमरजन्सी' सिनेमाच्या तयारीत व्यस्त आहे. सध्या ती आजारी असली तरी आपल्या कामावर मात्र तिचं लक्ष केंद्रीत आहे हे तिच्या व्यस्त शेड्युलमुळं समोर आलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.