Kangana Ranaut Seeks Blessings At Ram Mandir In Ayodhya, promotion of tejas  SAKAL
मनोरंजन

Kangana Ranauat: "जय श्रीराम!" कंगना रणौत पोहोचली अयोध्येला, हे आहे खास कारण

कंगना अयोध्या राम मंदिरात दर्शनाला पोहोचली आहे, हे आहे खास कारण

Devendra Jadhav

Kangana Ranaut at Ayodhya News: कंगना रणौत ही बॉलिवुडमधील लोकप्रिय अभिनेत्री. कंगना सातत्याने तिच्या बेधडक, बिनधास्त वक्तव्यामुळे चर्चेत असते. अशातच कंगना अयोध्या श्रीराम मंदिरात दर्शनाला पोहोचली आहे.

कंगनाचे अयोध्या राम मंदिराचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. कंगना अयोध्येला अचानक का गेली? याचं एक खास कारण आहे.

(Kangana Ranaut Seeks Blessings At Ram Mandir In Ayodhya)

म्हणुन कंगना अयोध्येला गेली

कंगना रणौतने आज गुरुवारी, 26 ऑक्टोबर रोजी अयोध्येतील राम मंदिरात आशीर्वाद घेतला. कंगना सध्या तेजसनिमित्ताने विविध मंदिरांना आणि पवित्र स्थळांना भेट देत आहे. त्यानिमित्ताने कंगनाने अयोध्येत प्रभु श्रीरामाचे आशीर्वाद घेतले आहेत. ॉ

कंगनाने अयोध्या राम मंदिरात दर्शन घेतानाचे फोटो तिच्या सोशल मीडियावर शेअर केलेत. यावेळी कंगनाने परिधान केलेली भगवी साडी सगळ्यांचे लक्ष वेधुन घेत होती.

कंगनाने X वर राममंदिरातील फोटो शेअर करुन कॅप्शन लिहिला, "मी श्री हरी विष्णूची भक्त आहे. आणि आज मला त्यांचा इतका आशीर्वाद मिळाला आहे. विष्णुचा अवतार असलेला परम पूज्य, महान धनुर्धारी, अप्रतिम योद्धा, तपस्वी राजा, मर्यादापुरुषोत्तम श्री राम यांचे जन्मस्थानी मी नतमस्तक झाले. माझ्या तेजस या चित्रपटात रामजन्मभूमीची विशेष भूमिका आहे. त्यामुळे रामलल्लाचे दर्शन करण्याची माझी इच्छा आज पूर्ण झाली.."

अशी पोस्ट लिहीत कंगनाने श्रीरामाप्रती तिच्या भावना व्यक्त केल्यात.

RSVP निर्मित तेजस सिनेमात कंगना राणौत मुख्य भूमिकेत आहे. तेजस हा सर्वेश मेवाडा लिखित आणि दिग्दर्शित आणि रॉनी स्क्रूवाला निर्मित आहे. कंगनाच्या या सिनेमाची खुप उत्सुकता आहे.

तेजस हा चित्रपट उद्या 27 ऑक्टोबर 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: भारताचा वर्षातील शेवटच्या T20I सामन्यात विक्रमी विजय! द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाही जिंकली

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

Rohit Sharma दुसऱ्यांदा झाला बाबा! रितिकाने दिला मुलाला जन्म; हिटमॅन आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार?

Record Breaker: Sanju Samson ची शतकासह विश्वविक्रमाला गवसणी; तिलक वर्मासह नोंदवले मोठे विक्रम अन्... Video

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

SCROLL FOR NEXT