eknath shinde : महाराष्ट्रातल्या राजकीय गोंधळाला आता पूर्णविराम लागलाय असं म्हणायला हरकत नाही. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आणि महाराष्ट्रासाठी हा मोठा धक्काच ठरला. कारण गेली काही दिवस शिंदे यांचे बंड, गुवाहाटी दौरा या सगळ्याने मोठी राजकीय उलथपालथ निर्माण झाली. त्यानंतर एकनाथ शिंदे मुंबईत आले. आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार असे वाटत असतानाच एकनाथ शिंदे यांचं नाव घोषित झालं. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे अडीच वर्षे सुरू असलेले महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. अगदी कालच ३० जून रोजीच एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधीही झाला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अभिनेत्री कंगना रणौत (kangana ranaut) हिने आपल्या खास शैलीत शिंदे यांना शुभेच्छा दिल्या आहेत. (Kangana Ranaut on Eknath Shinde)
कंगनाचा केंद्रा सरकारला आणि पर्यायाने भारतीय जनता पार्टीला उघड पाठिंबा आहे. ती बऱ्याचदा केंद्र सरकारचं कौतुक करत असते तर काँग्रेसला धारेवर धरते. महाविकास आघाडीवरही आणि विशेषतः शिवसेनेवर तिचा अधिक राग आहे. त्याचे कारणही तसेच खास आहे. २०२० मध्ये मुंबई महानगर पालिकेने अनधिकृत इमारतींवर कारवाई करण्याचे ठरवले., त्यामध्ये कंगनाचे मुंबई येथील ऑफिसचा काही भागही पाडण्यात आला. यावेळी कंगनाने शिवसेनेवर सडकून टीका केली होती. पण भाजपच्या पाठिंब्याने एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर कंगनाचा सूर काहीसा बदलताना दिसला. तिने चक्क एकनाथ शिंदे यांचं कौतुक केलं आहे.
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर कंगनाने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंट वर एक स्टोरी शेयर केली. ज्यामध्ये एकनाथ शिंदे यांचा फोटो आणि एक कौतुकाचा संदेश त्यात आहे. कंगना म्हणते, 'एकनाथ शिंदे यांची अत्यंत प्रेरणादायी अशी ही यशोगाथा आहे. आपला चरितार्थ चालवा म्हणून एकेकाळी रिक्षा चालवणारा व्यक्ती आज देशातील एक महत्वाचा आणि सर्वाधिक ताकदीचा मुख्यमंत्री होतो. सर, तुमचे खूप अभिनंदन..' अशा शब्दात कंगनाने शिंदे यांचे कौतुक केले आहे. तिच्या या पोस्टची सध्या भलतीच चर्चा सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.