Kangana ranaut targets Adipurush movie Don't defame Ram prabhas kriti sanon saif ali khan SAKAL
मनोरंजन

Kangana on Adipurush: रामाला बदनाम करू नका रे, कंगनाने आदिपुरुष सिनेमावर साधला निशाणा

आदिपुरुष रिलीज झाला पण तो वादाच्या भोवऱ्यात सुद्धा सापडलाय. आता आदिपुरुष वर कंगना रणौतने टीका केलीय.

Devendra Jadhav

Kangana Ranaut on Adipurush News: आदिपुरुष सिनेमा रिलीज झाला आणि सगळीकडे एकच चर्चा आहे ती म्हणजे सिनेमाची. ओम राऊत दिग्दर्शित आदिपुरुष सिनेमा रिलीज झालाय. अनेक वर्षांपासून सिनेमा पाहण्याची सर्वांना उत्सुकता होती.

अखेर हा सिनेमा रिलीज झाल्यावर प्रेक्षकांनी सिनेमा पाहायला गर्दी केली. आदिपुरुष रिलीज झाला पण तो वादाच्या भोवऱ्यात सुद्धा सापडलाय. आता आदिपुरुष वर कंगना रणौतने टीका केलीय.

वास्तविक, कंगनाने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये भगवान रामाचे काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये राम-सीता आणि हनुमान दिसत आहेत.

यासोबतच कंगनाने 'राम का नाम बदनाम ना करो' हे गाणेही या फोटोंच्या मागे लावले आहे. हे गाणे 1971 मध्ये आलेल्या हरे रामा हरे कृष्णा म्युझिकल ड्रामा चित्रपटातील आहे. या चित्रपटाची निर्मिती देव आनंद यांनी केली होती आणि त्यात त्यांनी अभिनयही केला होता.

कंगनाने उघडउघड नाव घेतलं नसलं तरीही तिने नकळतपणे प्रभासच्या आदिपुरुषला टार्गेट केलंय. कंगनाच्या स्टेटसवरून ते स्पष्टपणे दिसून येते.

नेटिझन्स मात्र यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. काही जण म्हणतात की कंगना साऊथच्या लोकांना घाबरते, तर काहीजण म्हणतात की आता कंगनाही चित्रपटाची खिल्ली उडवत आहे.

दरम्यान आदिपुरुष सिनेमा रिलीज होऊन एक दिवस झाले नाहीच तोच सिनेमा वादाच्या भोवऱ्यात सापडलाय.

आदिपुरुष’ चित्रपटातील राम, सीता, रावण आणि हनुमान या पात्रांचा समावेश असलेली कथित आक्षेपार्ह दृश्ये हटवण्याची किंवा दुरुस्त करण्याचे निर्देश मागणाऱ्या उजव्या विचारसरणीच्या गटाने शुक्रवारी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: राहुरी विधानसभा मतदारसंघात प्राजक्त तनपुरे ३४९ मतांनी आघाडीवर

Shiv Sena Shinde Vs Thackeray: गद्दारीचा आरोप झालेल्या शिंदे सेनेला मतदारांची साथ! ठाकरेंची सेना पिछाडीवर; जाणून घ्या आकडेवारी

सोलापूर जिल्ह्यात ‘हे’ उमेदवार आघाडीवर! भाजपचे ५, राष्ट्रवादी काँग्रेस १, शेकाप १, ‘तुतारी’चे २, उठाबा शिवसेना १, पोस्टल मतांची मोजणी पूर्ण, आता फेऱ्यांना सुरवात

Maharashtra Assembly Election Result : भाजप 100 जागांवर आघाडीवर, सलग तीन निवडणुकांमध्ये केले शतक पार

SCROLL FOR NEXT