karan kartik kangana file photo
मनोरंजन

'सुशांतसारखं त्याला आत्महत्येस प्रवृत्त करू नका'; करण जोहरवर भडकली कंगना

कार्तिक आर्यनची धर्मा प्रॉडक्शन्सच्या चित्रपटातून हकालपट्टी

स्वाती वेमूल

अभिनेता कार्तिक आर्यनची धर्मा प्रॉडक्शन्समधून अचानक हकालपट्टी करण्यात आली. कार्तिकच्या 'अनप्रोफेशनल' वागणुकीमुळे हे पाऊल उचलावं लागलं, असं स्पष्टीकरण करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शन्सकडून देण्यात आलं. कार्तिक आर्यन हा 'दोस्ताना २' या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार होता. मात्र आता त्याच्या जागी दुसऱ्या अभिनेत्याची निवड करण्यात येणार आहे. या संपूर्ण प्रकरणाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. एकीकडे कार्तिक अजूनही मौन बाळगत असताना अभिनेत्री कंगना राणावतने करण जोहरवर हल्लाबोल केला आहे. 'सुशांत सिंह राजपूतप्रमाणे कार्तिकला आत्महत्येस प्रवृत्त करू नका', अशा शब्दांत कंगनाने सुनावलं आहे.

काय म्हणाली कंगना?

'कार्तिक स्वत:च्या कर्तृत्वावर इथपर्यंत पोहोचला आहे आणि पुढेही तो स्वत:च्या बळावरच काम करेल. पापा जो (करण जोहर) आणि त्यांच्या नेपो गँग क्लबला विनंती आहे की कृपया त्याला एकटं सोडा. सुशांतप्रमाणे त्याच्या मागे लागून त्याला आत्महत्येस प्रवृत्त करू नका. कार्तिक, तुला या चिल्लर्सपासून घाबरायची काहीच गरज नाही. तुझ्या वागणुकीबाबत टीका करून, सर्व ठिकाणी आर्टिकल छापून आल्यानंतर या लोकांना आदरयुक्त मौन बाळगायचं आहे. त्यांनी सुशांतवरही ड्रग्जचं व्यसन आणि अनप्रोफेशनल वागणुकीचा ठपका ठेवला होता. आम्ही तुझ्यासोबत आहोत. जे तुम्हाला घडवू शकत नाही, ते तुमचं काहीच बिघडवू शकत नाहीत. आज तुला एकटं आणि सर्व बाजूंनी टीकांनी घेरल्यासारखं वाटत असेल. पण तू एकटा नाहीस. तू पुढेसुद्धा खूप चांगलं काम करशील', अशा शब्दांत कंगनाने कार्तिकला आधार दिला.

हेही वाचा : अभिनेता विवेक यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू

कार्तिकने या संपूर्ण प्रकरणावर अद्याप चकार शब्द काढलेला नाही. तर धर्मा प्रॉडक्शन्सने अधिकृतरित्या ट्विट करत त्यांची बाजू मांडली. मात्र या संपूर्ण प्रकरणात नेमकं काय घडलंय आणि त्यात चूक कोणाची आहे, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : हेलिपॅडवर बॅग तपासणीसाठी कुणी पुढं आलं नाही, उद्धव ठाकरे म्हणाले- आज मला.....

Latest Maharashtra News Updates : पोलिस असल्याच्या बहाण्याने सराफाची फसवणूक

सुबोध-तेजश्रीचे जुळले सूर ; बहुप्रतीक्षित हॅशटॅग तदैव लग्नम सिनेमाचा पहिला टीझर प्रेक्षकांच्या भेटीस

Dev Diwali 2024: देव दिवाळी का साजरी केली जाते? वाचा इतिहास अन् धार्मिक महत्व

Supriya Sule In Nashik : कांद्याला हमीभाव मिळवून देणार; खासदार सुप्रिया सुळे यांची चांदवडच्या सभेत ग्वाही

SCROLL FOR NEXT