kangana ranaut reached baba kedar nath temple uttarakhand  Esakal
मनोरंजन

Kangana Ranaut: अक्षय पाठोपाठ कंगनाही केदारनाथला बाबांच्या चरणी नतमस्तक

Vaishali Patil

kangana ranaut reached baba kedar nath temple uttarakhand news: बॉलीवूडची पंगा गर्ल कंगना रनौत नेहमीच काही ना काही कारणामुळे चर्चेत असलेली पहायला मिळते. अनेकदा आपल्या बेताल बोलण्यामुळेच ती चर्चेत येते. मात्र आज ती वेगळ्या कारणाने चर्चेत आली आहे. कंगनाने बुधवारी केदारनाथ मंदिरात जाऊन भगवान शिवाचं दर्शन घेतले.

कंगनाने आकरावे ज्योतिर्लिंग श्री केदारनाथ धाम मध्ये बाबांचे दर्शनाचा व्हिडिओदोखाल शेअर केला आहे. महामंडलेश्वर स्वामी 1008 कैलाशानंद जी महाराज यांनीही कंगनासह धाम येथे भगवान केदारनाथचे दर्शन घेतले.

कंगना रणौतने केदारनाथचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्री भोलेनाथचा जप करताना दिसत आहे. कंगनाने या व्हिडिओमध्ये निळ्या रंगाचा सूट घातला आहे. कानात मोठमोठे झुमके आणि कपाळावर टिळा लावला आहे. 

कंगनाने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना, तिने कॅप्शनमध्ये लिहिले- 'आज शेवटी केदारनाथजींना भेट दिली, तेही माझ्या आदरणीय कैलाशनंदजी महाराज आणि विजेंद्र प्रसादजींसोबत. धन्यवाद..'

तिने स्वतः सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे तिच्या चाहत्यांसोबत ही बातमी शेअर केली. महादेवाचे दर्शन घेतल्यानंतर कंगनानेही हर हर महादेवचा जयघोष केला.

बीकेटीसीचे मीडिया प्रभारी डॉ. हरीश गौर यांनी सांगितले की, चित्रपट अभिनेत्री कगंना रणौतनेही केदारनाथ यात्रा व्यवस्थेबद्दल मंदिर समिती आणि प्रशासनाचं कौतुक केले. यावेळी केदारनाथ उत्थान चॅरिटेबल ट्रस्टचे संयुक्त सचिव, योगेंद्र सिंह यांनी कंगना राणौतचे स्वागत केले आणि भगवान केदारनाथचा प्रसाद, भस्म, रुद्राक्ष माळा तिला दिली.

याआधी अक्षय कुमार भोलनाथचे आशीर्वाद घेण्यासाठी केदारनाथला पोहोचला होता. अभिनेत्याने केदारनाथ मंदिराचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला.

कंगणाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर कंगना लवकरच चंद्रमुखी 2 मध्ये दिसणार आहे. ब्लॉकबस्टर हिट तमिळ हॉरर कॉमेडी चित्रपट चंद्रमुखीचा हा पुढचा भाग असेल. कंगनाने नुकतेच 'इमर्जन्सी' चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. या चित्रपटात ती माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Amit Thackeray Maharashtra Assembly Election : अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीत उतरले अन् तिरंगी लढतीच्या चक्रव्यूहात अडकले; ठाकरे ब्रँडचं काय होणार?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अंधेरी पूर्व विधानसभेत मुर्जी पटेल आघाडीवर

Whatsapp Call Recording : मिनिटांत रेकॉर्ड करा व्हॉट्सॲप कॉल, सोपी स्टेप वाचा एका क्लिकमध्ये..

Margashirsha Amavasya 2024: मार्गशीर्ष अमावस्येच्या शुभ मुहूर्तावर करा गंगा स्नान, जाणून घ्या महत्व

SCROLL FOR NEXT