मनोरंजन आणि राजकारण ही दोन क्षेत्र अशी आहेत जी नेहमीच हातात हात घालून चालली आहेत. आता बघा नं,अनेक सिनेमांना राजकीय कथांनी भुरळ घातली आहे तर राजकीय नेत्यांनी अनेकदा आपल्या प्रचारासाठी सेलिब्रिटींची साथ मागितली आहे. असे कितीतरी सेलिब्रिटी आहेत ज्यांनी निवडणुका लढवल्या आहेत. काहींना यात यश मिळालं तर काहींना नाही. दस्तुखुद्द अमिताभ बच्चन यांनीही सिनेक्षेत्रातील चांगलं करिअर सोडून राजकीय मार्गावर चालायचं ठरवलं होतं, पण नशीब अपयश आल्यानं वेळीच माघार पत्करली त्यांनी. आणि म्हणून तर आपण त्यांच्या चांगल्या कलाकृती पाहू शकलो. कंगना रनौतचीही(Kangana Ranaut) काही वादग्रस्त वाक्य ऐकून,तिचं धाडस पाहून वाटत होतं की बाईंच्या मागे कुणीतरी राजकीय हस्ती नक्कीच आहे. तर ती आज तिच्या इन्स्टाग्राम पोस्टवरून समोर आली आहे. त्याचबरोबर कळतंय बाई उत्तरप्रदेशातनं नक्की निवडणूक लढवणार. आता हे सगळे अंदाज का बांधले जातायत त्यासाठी सविस्तर वाचा.
उत्तर प्रदेशमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीचं वारं वाहतंय. अशात अनेक सेलिब्रिटीही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या या निवडणुकीत सहभागी होताना दिसत आहेत. काहींना तर राजकीय पक्षांकडून तिकीटदेखील मिळालंय. अशात आता कंगनाने एन्ट्री केली आहे. कंगना रनौतने (kangana ranaut) एक फोटो तिच्या इंन्स्टाग्रामवर ( instagram) शेअर केला. त्यावर कुणी टिका केली तर कुणी पाठिंबा दिला आहे. कंगना आपल्या रोखठोक बोलण्यासाठी प्रसिद्ध आहे. ती वेगवेगळ्या विषयांवर आपली मतं मांडत असते. आपली मतं प्रदर्शित करणाऱ्या पोस्ट ती सोशल मीडियावर शेअर करत असते.
सध्या तिने अशीच एक स्टोरी इन्स्टाग्रामवर पोस्ट केली आहे. यात तिने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या घराचा फोटो शअर केला आहे. यात तिने योगी आदित्यनाथ यांच्या घराची तुलना मायावती, अखिलेश यादव यांच्या घरांशी केली आहे. तिने मायावती, अखिलेश यादव यांच्यापेक्षा योगी आदित्यनाथ यांचं घर किती साधं आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आता कंगनाने पोस्ट केली म्हटल्यावर चर्चा तर होणारच ना! या इन्स्टाग्राम स्टोरीचा स्क्रिनशॉट शेअर करत अनेकांनी कंगनाच्या या पोस्टवरची आपली मतं मांडली आहेत. काहींनी तिच्या मताला पाठिंबा दिलाय तर काहींनी विरोध दर्शवला आहे. कंगना उघडपणे भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा देताना दिसते. काही दिवसांपुर्वी कंगनाने योगी आदित्यनाथ यांची भेटही घेतला होती. नुकतंच तिला पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.