Kantara 2 first look: Rishab Shetty shows : 'कांतारा' ज्यांनी पाहिला असेल त्यांचा त्याविषयीचा अनुभव वेगळाच असल्याचे यापूर्वी सोशल मीडियावर दिसून आले आहे. ऋषभ शेट्टीनं त्याच्या या चित्रपटातून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. आगळीवेगळी कथा, त्याची प्रभावी मांडणी, लक्ष वेधून घेणारे सादरीकरण, त्याच्या जोडीला उत्तम छायाचित्रण, लाईट अन् संगीत यामुळे कांतारा वैशिष्ट्यपूर्ण ठरला होता.
आता कांतारा २ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच त्याचा टीझर प्रदर्शित झाला आणि नेहमीप्रमाणे प्रेक्षकांनी ऋषभवर कौतुकाचा वर्षाव केला. पहिल्या भागातील त्याच्या अभिनयानं प्रेक्षकांची मोठी दाद मिळवली होती. दुसऱ्या भागातून नेमक्या कोणत्या रुपातून तो समोर येणार आहे याची मोठी चर्चा रंगली आहे. टॉलीवूडच्या या ब्लॉकबस्टर चित्रपटानं वेगळा विक्रम आपल्या नावावर नोंदवला आहे.
Life Balance जाणून घ्या हा 'वेक अप काॅल' आणि बना सर्वार्थाने समृद्ध
कांताराच्या प्रिक्वेलचा टीझर पाहिल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत. तो नेमक्या कोणत्या भूमिकेत आहे, यावेळी तो चाहत्यांना काय सरप्राईज देणार असा प्रश्न अनेकांना पडला आहे. कित्येकांना तो मोठ्या देवतेच्या रुपात दिसला आहे. त्या गावातल्या लोकांचा तो मुळ देवता आहे. त्याच्या आशीर्वादानं सारं काही सुरु आहे. आणि त्याला प्रसन्न करुन घेण्यासाठी गावकऱ्यांनी आवाहन केलं आहे.
टीझरमध्ये जे पात्र आहे ते सांगतं की, प्रकाश...तुम्हा प्रत्येकाला प्रत्येकठिकाणी तो प्रकाश दिसेल. पण तुम्हाला सांगतो हा काही प्रकाश नाही तर ती एक दृष्टी आहे. भविष्यात काय होणार हे सांगणारी दृष्टी.. तो प्रकाश सर्व काही सांगून जाणारा आहे, तुम्ही पाहिला ना तो....असं सांगून तो अंतर्धान पावतो.. या टीझरमुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
‘टीझर’मधून दिग्दर्शकाने स्वतःसाठी निर्माण केलेल्या त्या वेगळ्या जगाची झलक दिसून येते. यासह, पहिल्यांदा प्रतिध्वनित झालेली परिचित गर्जना पुन्हा एकवार ऐकू यायला लागली आहे, जी एका आख्यायिकेच्या जन्माची आणि या सर्वाच्या प्रारंभाचा एक वेगळं वातावरण तयार करते. टीझरमधून दिसणाऱ्या ऋषभ शेट्टीच्या त्या पात्रात, प्रेक्षक खोलवर बुडून जातो.
होम्बले फिल्म्स’च्या वतीनं कांताराची निर्मिती केली गेली होती. त्याचे दिग्दर्शन ऋषभ शेट्टीनं केले होते. गेल्या वर्षी ‘केजीएफ चॅप्टर २’ आणि ‘कंतारा’ या दोन मेगा ब्लॉकबस्टर्ससह जागतिक स्तरावर तब्बल १,६०० कोटी रुपयांची कमाई करून वेगळा विक्रम आपल्या नावावर केला होता. सात भाषांमध्ये प्रेक्षकांना भुरळ पाडणारा ‘कंतारा चॅप्टर १’ हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात येत असून डिसेंबरच्या अखेरीस या चित्रपटाचे शूटिंग सुरू होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.