Kapil Sharma Instagram
मनोरंजन

The Kapil Sharma Show: त्यानंतर कपिलनं आपल्या शो मध्ये 'तो' शब्द कधीच वापरला नाही.., जाणून घ्या प्रकरण..

करिना कपूरच्या शो मध्ये कपिल शर्मा नुकताच सहभागी झाला होता. तेव्हा त्यानं विनोद करताना भाषेच्या बाबतीत असलेल्या चॅनेलच्या कडक नियमांचा खुलासा केलाय.

प्रणाली मोरे

The Kapil Sharma Show: कॉमेडी अभिनेता कपिल शर्मा नुकताच करीना कपूरच्या What Women Want या शो मध्ये सहभागी झाला होता.

या शो मध्ये कपिल शर्मानं अनेक विषयांवर संवाद साधताना आजच्या काळात एखाद्या विनोदाचा चुकीचा अर्थ लावला जातोय याविषयी देखील थेट भाष्य केलं. विनोदी कलाकारांना देखील आपल्या भाषेचा वापर खूप काळजीपूर्वक करावा लागत आहे असं देखील कपिल म्हणाला.(Kapil Sharma reveals he stopped from using 'pagal 'word in his show inside story)

करीना कपूरनं जेव्हा कपिलला विचारलं की,''एक समाज म्हणून आज आपण पाहतोय खूप गोष्टींचा विकास होत आहे, १० वर्ष आधी जे विनोद लोकांना मजेदार वाटायचे,त्यावरनं आज वाद रंगताना दिसत आहेत. तर मग तू जेव्हा तुझ्या टीमसोबत स्क्रिप्ट लिहायला बसतोस तेव्हा वाद होऊ नयेत याची काळजी कशी घेतोस..किंवा कोणत्या गोष्टीवर विनोद करायला नको याचे नियम कसे तुम्ही स्वतःसाठी घालून घेतले आहेत?''

करीनाच्या या प्रश्नाचं उत्तर देताना कपिल शर्मा म्हणाला की,'' मी पंजाबमधील अमृतसर इथून आहे..जिथे वर पक्षाकडनं वधूपक्षावर खूप विनोद केले जातात आणि त्यांना खूप वेगवेगळ्या नावांनी बोलवतात..त्यांची खिल्ली उडवतात. बॉडी शेमिंग आणि त्यासंबधित अनेक गोष्टी आमच्या कल्चरचा एक भाग होत्या पण आज त्यावरनं काही बोललं तर मोठा वाद उसळतो''.

कपिल शर्मा पुढे म्हणाला, ''जेव्हा तुम्ही एका चॅनेलचा भाग असता तेव्हा अनेक गोष्टींबाबतीत काही नियम असतात. भाषा वापरण्याच्या बाबतीत जरा जास्तच. मला एकदा चॅनलकडून सांगण्यात आलं होतं की, तुम्ही यापुढे 'पागल' हा शब्द वापरायचा नाही''.

''मला काही नीट कळलं नाही म्हणून मी 'का' हा प्रश्न विचारला. त्यानंतर चॅनेलकडून मला कारण सांगितलं गेलं की,ज्यांच्यासाठी हा शब्द तुम्ही वापरता ते नाराज होतात. त्यांना त्यांचा तो अपमान वाटतो''.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Latest Marathi News Updates live : पुण्यातील नवले पुलावर 2 वाहनांचा अपघात, 3 जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT