Karan Johar: बॉलीवूड सेलिब्रिटींचे एअरपोर्ट लूक सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. एअरपोर्टवरील पापाराझी सेलिब्रिटींना आपल्या कॅमेऱ्यात बंदिस्त करतात आणि मग त्यांचे फोटो-व्हिडीओ समोर येत असतात.
मंगळवारी २१ मार्च रोजी करण जोहर एअरपोर्टवर पोहोचला खरा पण त्याच्यासोबत असं काही घडलं की लोक त्याला ट्रोल करू लागले. करण नेहमीच सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या निशाण्यावर दिसतो.
अशामध्ये जेव्हा त्याचा व्हिडीओ समोर आला तेव्हा लोकांनी त्याला खूप सुनावलं आहे. त्याचं झालं असं की करण जोहर एअरपोर्टवर पोहोचला आणि तेथील पोलिसांना तिकीट न दाखवताच मुख्य गेटमधून आत शिरत होता. (Karan Johar Airport video viral and director troll)
करणच्या एअरपोर्टवरील व्हायरल झालेल्या व्हिडीओत दिसत आहे की पोलिस आत जात असताना त्याला थांबवतात आणि तिकीट दाखवायला सांगतात. करण बॅगेतून काही पेपर काढतो आणि पोलिस अधिकाऱ्यांना दाखवतो.
त्यानंतर आतमध्ये जाण्यासाठी पुन्हा गेटच्या दिशेनं जातो. करणनं यावेळी ब्लॅक रंगाचा टीशर्ट आणि त्यावर व्हाइट जॅकेट घातलेलं दिसत आहे. तसंच त्यावर त्यांन सैलसर पॅंट घातली आहे. आणि या सगळ्या लूकला पूर्ण करताना डोळ्यावर ब्लॅक सनग्लासेस देखील त्यानं घातले आहेत.
करणचा हा व्हिडीओ व्हायरल होताच एका नेटकऱ्यानं कमेंट केली आहे की,'या लोकांना वाटतं यांना डॉक्युमेंट्स दाखवण्याची गरज नाही,नियम तर नियम असतात. हद्द आहे'.
आणखी एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे,'हे एअरपोर्टवर शायनिंग मारण्यात इतके बिझी असतात की सुरक्षारक्षकांना पेपर दाखवायचं देखील यांच्या लक्षात राहत नाही'.
आणखी एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे की,'वाह,पोलिस अंकल..'
तर एकानं लिहिलं आहे की,'सर्वांसमोर याचा मस्त याची लाज गेली. याला वाटलं असेल असंच जाऊ देतील. जणू विकत घेतलाय एअरपोर्ट यानं'.
करण जोहरचा आगामी 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' सिनेमाचं शूटिंग नुकतंच पूर्ण झालं आहे. यामध्ये आलिया भट्ट,रणवीर सिंग,जया बच्चन,शबाना आझमी यांनी काम केलं आहे. सिनेमा २८ जुलै,२०२३ रोजी प्रदर्शित होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.