Karan Johar On KGF 2: दिग्दर्शक प्रशांत नीलच्या 'केजीएफ 2' ने देशभरात धमाका केला होता. साऊथ स्टार यशची मुख्य भूमिका असलेल्या या सिनेमानं कितीतरी सिनेमांचा रेकॉर्ड तोडत सर्वांनाच मागे टाकलं होतं. केजीएफ २(KGF 2) ची बॉलीवूडच्या सेलिब्रिटींनी प्रशंसा करताना,टॉलीवूडचं(Tollywood) यश देखील एन्जॉय केलं होतं. हा सिनेमा हिट झाल्यानंतर लोकांनी बॉलीवूडच्या दिग्दर्शकांना खूप ऐकवलं होतं. लोकांचे म्हणणे होते की साउथ इंडस्ट्रीतच फक्त असे सिनेमे बनू शकतात,बॉलीवूडमध्ये असे सिनेमे कधीच बनणार नाहीत. आता याच मुद्द्यावर करण जोहरनं चुप्पी तोडत उत्तर दिलं आहे. बॉलीवूडमध्ये केजीएफ २ सारखे सिनेमा का बनत नाहीत यावर करण (Karan Johar) स्पष्टच बोलला आहे.(Karan Johar Says if KGF2 would be made in bollywood, than we would be lynched)
एका मुलाखतीत करण जोहरने केजीएफ चॅप्टर २ विषय बोलताना म्हटलं आहे की,''जेव्हा मी केजीएफ विषयी छापून आलेले रिव्ह्यू वाचले तेव्हा मी विचारात पडलो. मी विचार केला की जर मी अशा पद्धतीचा सिनेमा बनवला असता तर मी चांगलाच तोंडावर पडलो असतो, एखाद्या जमावानं माझा सिनेमा नं पाहताच माझ्याविरोधात पाऊल उचललं असतं. पण इथे केजीएफचं यश सेलिब्रेट केलं जात आहे. अर्थात तो सिनेमा मला देखील खूप आवडला पण मी विचार केला की मी जर तो सिनेमा केला असता तर त्याची अवस्था का असती?''
करण पुढे म्हणाला की, ''बॉलीवूडचे फिल्ममेकर्सना तशी सूट मिळत नाही जी साऊथच्या निर्मात्यांना नेहमी मिळते. आणि त्या आनंदाला ते लोक सेलिब्रेटही करतात. आपण आपल्याकडे जे सुरु केलंय ते थांबवायला हवं. जर मी तसा सिनेमा बनवला असता तर एकतर त्याच्यावर बंदी आणली असती किंवा आम्हाला उध्व्स्त करण्यामागे सगळे एकवटले असते''.
करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनच्या बॅनर अंतर्गत 'जुग जुग जियो' सिनेमा २४ जून रोजी रिलीज झाला होता. या सिनेमात वरुण धवन,कियारा अडवाणी, अनिल कपूर, नीतू कपूर सारखे कलाकार होते. तसंच,आता यानंतर करण 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' सिनेमाच्या माध्यमातून अनेक वर्षांनी पुन्हा दिग्दर्शन करताना दिसणार आहे. या सिनेमात रणवीर सिंग आणि आलिया भट्ट मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.