mumbaikar 
मनोरंजन

करण जोहरने शेअर केलं 'मुंबईकर'चं फर्स्ट पोस्टर, 'हे' सेलिब्रिटी दिसणार एकत्र

दिपाली राणे-म्हात्रे

मुंबई-  नवीन वर्षाच्या सुरुवातीला सिने निर्माता-दिग्दर्शक करण जोहरने प्रेक्षकांना एक खास ट्रिट दिली. त्याने नवीन वर्षाच्या खास निमित्ताने मुंबईकर सिनेमाचं पहिलं पोस्टर सोशल मिडियावर शेअर केलं आहे आणि त्याच्या चाहत्यांना एक वचन देखील दिलं आहे. केवळ करण जोहरनेच नाही तर एसएस राजामौलीने सिनेमाचं पोस्टर रिलीज केलं आहे. मोस्ट अवेटेड सिनेमा 'अशोका'मधून १९ वर्ष आधी हिंदी सिनेमामध्ये दिग्दर्शक म्हणून सुरुवात करणारे सेलिब्रिटी सिनेमेटोग्राफर संतोष सिवान पुन्हा एकदा मोठ्या सेलिब्रिटींसोबत मोठा सिनेमा बनवण्याची तयारी करत आहेत. 

सिने निर्माता करण जोहरने 'मुंबईकर' सिनेमाचं पहिलं पोस्टर शेअर करत म्हटलंय, 'मी वचन देतो की हा एक खूपच जबरदस्त सिनेमॅटिक अनुभव असेल. करणने त्याच्या टीमचं कौतुक करत म्हटलंय, या अनोख्या आणि टॅलेंटेड टीमला माझ्याकडून शुभेच्छा.' पोस्टरविषयी सांगायचं झालं तर या पोस्टरमध्ये सिनेमाचं टायटल लिहिलं आहे. या टायटलच्या अक्षरांमध्ये सिनेमातील सगळे मुख्य कलाकार दिसून येत आहेत. 

मुंबईचं एक प्रसिद्ध घोषवाक्य आहे ते म्हणजे 'मी मुंबईकर' म्हणजेच मी मुंबईचा आहे. असं म्हटलं जातंय की 'स्लमडॉग मिलिनियर' आणि 'गली बॉय'नंतर 'मुंबईकर' असा सिनेमा असेल ज्यामध्ये मुंबईला आणखी गडदप्रकारे आणि वेगळ्याप्रकारे दाखवण्यात येईल.

या सिनेमाच्या मुख्य भूमिकेमध्ये विक्रांत मैसी, विजय सेतुपती, तान्या मानिकलता, संजय मिश्रा, रणवीर शौरी आणि सचिन खेडेकर यांची निवड करण्यात आलेली आहे. प्रोडक्शनच्या बाबतीत सांगायचं झालं तर शिबू थामीन्सचा हा हिंदी प्रोडक्शन पदार्पणातील पहिला सिनेमा असेल.   

karan johar share first look poster of mumbaikar says promise this will be tremendous cinematic experience  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gas Tanker Accident: मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वारजे पुलाजवळ गॅस टँकर पलटी; मुंबईकडून साताऱ्याच्या दिशेने जाणारी वाहतूक ठप्प

IND vs AUS 1st Test : 8 Runs, 3 Wickets! यशस्वी जैस्वालच्या विकेटनंतर भारताचा डाव गडगडला; ऋषभ पंत, ध्रुव जुरेल ठरले अपयशी

Nashik Assembly Election 2024 Result : नाशिकमध्ये महिला आमदारांची पुनरावृत्ती; जिल्ह्यात 196 उमेदवारांपैकी 20 महिला

Assembly Elections 2024 : पोटनिवडणुकीत सत्ताधाऱ्यांची बाजी

Kolhapur North Results : सतेज पाटलांचा बालेकिल्ला ढासळला; राजेश लाटकरांना अपेक्षित मताधिक्य नाहीच!

SCROLL FOR NEXT