मनोरंजन

Kareena On Chandrayaan 3 : "अभिमानाचा क्षण! चांद्रयानाच्या लँडिंगचा सोहळा मुलांसोबत पाहणार"; करिना कपूर झाली भावूक

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : भारताचं महत्वाकांक्षी चांद्रयान ३ सध्या चंद्राच्या कक्षेत फिरत आहे. दोन दिवसांनी अर्थात २३ ऑगस्ट रोजी हे यानं चंद्रावर सॉफ्ट लँडिग करणार आहे. इस्त्रोसह प्रत्येक भारतीयांसाठी हा अभिमानाचा क्षण असणार आहे. त्यामुळं सध्या या विषयाची देशभरात चर्चा आहे. यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर हीनं देखील प्रतिक्रिया दिली आहे. (Kareena Kapoor reaction On Chandrayaan 3 moment of Chandrayaan landing on moon with my Boys)

करिनानं काय म्हटलं?

एका पत्रकार परिषदेत करिनाला पत्रकारांनी चांद्रयान ३ बद्दल विचारलं. यावरनं तिनं हा अभिमानाचा क्षण असल्याची प्रतिक्रिया दिली. तसेच चांद्रयान ३ चंद्रावर उतरण्याचा क्षण हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा क्षण आहे. आपल्याला हृदयातून याचा अभिमान वाटावा असा हा सोहळा असेल. सध्या प्रत्येक भारतीय याच्या प्रतिक्षेत आहे. मी देखील माझ्या मुलांसोबत हा क्षण अनुभवणार आहे, असंही तीनं म्हटलं आहे.

भारताच्या चांद्रयान मोहिमा काय?

पृथ्वीचा उपग्रह असलेल्या चंद्राचा अभ्यास करण्यासाठी भारतानं आजवर तीन महत्वाकांक्षी मोहिमा लॉन्च केल्या आहेत. या मोहिमांना चंद्रयान-१, चांद्रयान-२ आणि चांद्रयान-३ अशी नावं देण्यात आली. यांपैकी पहिली चांद्रयान १ मोहिम २२ ऑक्टोबर २००८ रोजी लॉन्च करण्यात आली होती.

चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळील शॅकलटन क्रेटर इथं या यानातील प्रोब आदळला होता. या यानाचा कार्यकाळ दोन वर्षांचा होता. या काळात या प्रोबकडून चंद्राच्या पृष्ठभागाचे सर्वेक्षण करून त्याचा संपूर्ण रासायनिक नकाशा तयार करणं तसेच चंद्राच्या संरचनेचा त्रिमितीय नकाशा तयार करण्याचं काम केलं.

चांद्रयान २ मोहिम अपयशी

त्यानंतर भारतानं चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करण्याची महत्वाकांक्षी मोहिम आखली. ही मोहिम इस्रोद्वारे २२ जुलै २०१९ रोजी लॉन्च करण्यात आली. भारताची ही मोहिम अयशस्वी ठरली होती. कारण या यानातील विक्रम लँडरचं चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करण्यात येणार होतं. पण लँडर या प्रक्रिये दरम्यान, आदळल्यानं त्याचे तुकडे झाले होते.

चांद्रयान ३ बाबत उत्सुकता

चांद्रयान २ च्या अपयशानंतर भारतानं चांद्रयान ३ मोहिम लॉन्च केली. या यानानं १४ जुलै २०२३ रोजी चंद्राच्या दिशेनं झेपावलं. हे यानं २३ ऑगस्ट २०२३ रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ५ वाजून २७ मिनिटांनी चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणार आहे. त्यामुळं या मोहिमेबाबत सर्व भारतीयांमध्ये प्रचंड उत्सुकता ताणली गेली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT