Kartik Aaryan buys luxury apartment for Rs 17.50 crore in Mumbai’s Juhu  SAKAL
मनोरंजन

Kartik Aryan Buys Home: किंंमत १७ कोटी, ठिकाण जुहू, कार्तिक आर्यनने खरेदी केलं आलिशान घर

कार्तिकच्या नवीन घराच्या पुजेचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत.

Devendra Jadhav

Kartik Aryan Buys New Home at Juhu Mumbai News: कार्तिक आर्यन हा बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेता. कार्तिकने त्याच्या करिअरच्या छोट्या कारकीर्दीत खुप मोठी मजल मारली आहे. कार्तिक आर्यनच्या आयुष्यात एक मोठी गोष्ट घडली.

कार्तिकने मुंबईत जुहू मध्ये नवीन घर खरेदी केलंय. कार्तिकच्या नवीन घराच्या पुजेचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत.

(Kartik Aaryan buys luxury apartment for Rs 17.50 crore in Mumbai’s Juhu)

मीडिया रिपोर्ट्सनुसार, कार्तिक आर्यनने पॉश एरिया जुहूमध्ये 1,594 स्क्वेअर फूटचा हा अपार्टमेंट 17.50 कोटी रुपयांना खरेदी केला आहे.

सिद्धीविनायक बिल्डिंगमध्ये त्याचे घर आहे. या कॅम्पसमध्ये 'प्रेसिडेन्सी सोसायटी' देखील आहे, जिथे कार्तिक आर्यनचे दुसरे घर आहे. या घरात कार्तिकचे कुटुंब राहते.

कार्तिकने हे घर 1.10 लाख रुपये प्रति स्क्वेअर फूट दराने विकत घेतल्याचे रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे. या अपार्टमेंटसोबतच त्यांनी कार पार्किंगची जागाही घेतली आहे.

गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यातच कार्तिक आर्यनबद्दल बातमी आली होती की तो नवीन घर शोधत आहे.

जुहू तारा रोड येथील प्रनेता अपार्टमेंटमध्ये अभिनेता शाहिद कपूरकडून एक घर भाड्याने घेतले होते. त्यासाठी त्यांनी ३६ महिन्यांचा भाडेपट्टा घेतला होता. आता कार्तिकने मेहनतीच्या जोरावर स्वतःसाठी आणि आई -

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांचा रोमँटिक ड्रामा चित्रपट 'सत्यप्रेम की कथा' सध्या थिएटरमध्ये आहे.

बकरी ईदच्या मुहूर्तावर २९ जून रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे.

या चित्रपटाने 9 दिवसांत जवळपास 56 कोटींची कमाई केली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक समीर विद्वांस आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अमित शहांनी केले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे अभिनंदन

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: सुनील शेळके १ लाख २ हजार ९६७ मतांनी आघाडीवर

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT