Kartik Aaryan Travelled In Economy Class: कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी हे त्याच्या 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्याचा हा चित्रपट लवकरच रिलिज होणार आहे.
दरम्यान दोघेही स्टार या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. नुकतच त्यांनी जयपुरमध्ये या चित्रपटाचे प्रमोशन केले. मात्र आता कार्तिक आर्यन सोशल मिडियावर खुप ट्रोल होत आहे. त्याचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. ('Satyaprem Ki Katha')
या व्हिडिओत तो इंडिगो एअरलाइनच्या इकॉनॉमी क्लासमध्ये प्रवास करतांना दिसत आहे. या फ्लाइटचा व्हिडिओ कार्तिक मुंबईत येण्यापूर्वीच व्हायरल झाला होता.
विरल भयानी यांच्या अकाउंटवरून कार्तिकचा हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.
पापाराझीच्या या अकाऊंटवर कार्तिकचा व्हिडिओ शेयर करत त्यांनी कॅप्शन दिले, "हे खरोखर काय आहे !! ! कार्तिक आर्यनने आज इंडिगो फ्लाइटच्या इकॉनॉमी सेक्शनमध्ये प्रवासाचा आनंद लुटला, तो प्रवासी खूपच भाग्यवान होता असे म्हणायला हवं." (Kartik Aaryan)
कार्तिकचा हा व्हिडिओ सोशल मिडिया प्रचंड व्हायरल झाला. त्याच्या चाहत्यांनी या व्हिडिओवरुन कार्तिकच कौतुक केलं तर अनेकांनी कार्तिकला खुप ट्रोल केलं. नेटकऱ्यांनी पब्लिसिटी स्टंट करत असल्याच म्हटलं आहे.
बहूतेक त्याचा नवीन चित्रपट रिलीज होणार असेल असं एकानं लिहिलं आहे. तर 'सिनेमाच्या प्रमोशनचा आता हाच मार्ग शिल्लक आहे' असल्याच एकानं लिहिल आहे. आता चित्रपट येत असल्याने तो ही नौटंकी करत असल्याच एकानं लिहिलं. अशा अनेक कमेंट करत आर्यनला ट्रोल केल जात आहे.
तर दुसरीकडे कार्तिकच्या चाहत्यांनी त्याला पाठिंबा द्यायला सुरुवात केली आहे. तो नेहमीच इकॉनॉमी क्लासमध्ये प्रवास करतो असं एकानं लिहिलयं तर दुसऱ्याने कार्तिक खुप डाउन टू अर्थ आहे असं म्हटलं आहे.
कार्तिकच्या 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर या चित्रपटात कार्तिकसोबत कियारा अडवाणी पुन्हा एकत्र काम करणार आहे. सध्या या चित्रपटावरुनही वाद सुरु आहे. या चित्रपटात पाकिस्तानी गाणं 'पसुरी' चा रिमेक केले जात आहे. (PasooriNu Song)
अरिजित सिंगने हे गायलं आहे. या गाण्याच्या रिमेकबद्दल चाहते खुप नाराज आहेत. त्यांनी या गाण्याला विरोध केला आहे. 'सत्य प्रेम की कथा' 29 जून रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.