karan mehra,nisha rawal,kashmera shah file image
मनोरंजन

'करण निशाला मारायचा...' कश्मीरानं घेतली मैत्रिणीची बाजू

निशाने केलेले सर्व आरोप करणने फेटाळले असून तिला बायपोलर डिसॉर्डर आहे असे एका मुलाखतीमध्ये सांगितले

प्रियांका कुलकर्णी

मुंबई - सध्या 'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेमधील कलाकर करण मेहरा karan mehra आणि पत्नी अभिनेत्री निशा रावलच्या nisha rawal वैयक्तिक वादाची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. निशाने करणवर कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर करणला अटक झाली. निशाने माध्यमांसोबत बोलताना सांगितले,'करणचे एक्स्ट्रा-मॅरिटल अफेअर आहे आणि हे त्याने स्वत:सुद्धा माझ्यासमोर कबुल केले आहे. त्याच्या विवाहबाह्य संबंधाविषयी माहिती झाल्यानंतरही मी गोष्टी मार्गावर आणण्याचा प्रयत्न करत होते. त्याच्याशी बोलून उपाय काढण्याचा प्रयत्न करत होते, मात्र तो ऐकण्याच्या मनस्थितीतच नाही.' यावर करणने प्रतिक्रिया देखील दिली आहे. निशाने केलेले सर्व आरोप करणने फेटाळले असून तिला बायपोलर डिसॉर्डर आहे असे एका मुलाखतीमध्ये सांगितले. आता या सर्व प्रकरणावर छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री कश्मीरा शहानं kashmera shah सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे.(kashmera shah sides with friend nisha rawal says karan mehra had messed up finances and has been hitting her)

कश्मीराने एका मुलाखतीमध्ये सांगितले, 'मी निशाच्या बाजूने आहे कारण खरच करण निशाला मारत होता. पैश्यावरून त्यांच्यामध्ये खूप वाद निर्माण झाले होते. याआधी देखील करणने तिला मारले होते. निशा या विषयी जास्त काही बोलत नव्हती कारण तो त्यांचा वैयक्तिक विषय होता. आम्हाला माहित होते की या दोघांमध्ये काही तरी वाद आहेत. मी त्यांची जवळची मैत्रिण आहे. करण मेहराने आरोप केले आहेत की, निशाने त्याच्या आईला शिव्या दिल्या त्याच्या नंतर निशाने तिचे डोके भिंतीवर आपटले. पण हे सर्व तो स्वत:ला वाचवण्यासाठी बोलत आहे. निशाने जे सांगितले आहे ते खरे आहे. माझ्या मैत्रिणीची बाजू घेत आहे आणि नेहमी घेत राहिल.'

प्रसिद्ध टॅरो कार्ड रीडर मुनिशा खतवानी आणि डिजाइनर रोहित वर्मा यांनी देखील करण आणि निशा यांच्यामधील वादाबद्दल सोशल मीडियावर आपले मत व्यक्त केले आहे. मुनिश आणि रोहित हे निसाचे जवळचे मित्र आहेत. मुनिशा खतवानी यांनी पोस्ट करत लिहीले, 'आता ही वेळ मौन तोडण्याची आहे. कधीच कोणत्या पुस्तकाच्या कव्हर वरून पुस्तकामध्ये काय आहे त्याचा अंदाज लावू नये. मला शांत बसायला सांगितले होते. मी आता शांत बसू शकत नाही. आम्ही सर्व सोबत आहोत.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूरांचा गड कोसळला; पालघर जिल्ह्यात महायुतीचा दबदबा वाढला

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: उमरगा विधानसभा मतदार संघात कोणाचा गुलाल उधळणार?

Satara-Jawali Assembly Election 2024 Results : साताऱ्यात भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले 1 लाख 40 हजार 120 मतांनी विजयी; राज्यात रेकॉर्डब्रेक मताधिक्य

Ambegaon Assembly Election 2024 result live: दिलीप वळसे-पाटील आठव्यांदा आमदार होणार; शिष्य देवदत्त निकम पराभूत

Maharashtra Election 2024: प्रविण दरेकरांचा 'तो' दावा खरा ठरला! राज्यात महायुतीचेच सरकार येणार

SCROLL FOR NEXT