Kashmir Unreported Teaser  esakal
मनोरंजन

Kashmir Unreported Teaser : काश्मीर फाईल्स नंतर पुन्हा नवं वादळ! 'काश्मिर अनरिपोर्टेड', आहे तरी काय?

युगंधर ताजणे

Kashmir Unreported Teaser - बॉलीवूडमध्ये विवेक अग्निहोत्री यांचे नाव काश्मिर फाईल्सनंतर चांगलेच गाजले. त्या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई केली होती. ज्यावेळी काश्मिर फाईल्सचा टीझर आला त्यावेळी हा चित्रपट ३०० हून अधिक कोटींची कमाई करेल असे कुणालाही वाटले नव्हते. मात्र सोशल मीडियावर या चित्रपटाबाबत झालेला प्रचार, प्रसार दखलपात्र होता.

काश्मिर फाईल्स हा चित्रपट पाहण्यासाठी वेगवेगळया शासकीय यंत्रणांकडून उपक्रम राबवण्यात आले होते. इतकेच नव्हे तर सत्ताधारी पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी देखील या चित्रपटाचे कौतूक केले होते. भारतीय चित्रपट इतिहासातील आतापर्यतचा सर्वाधिक वादग्रस्त चित्रपट म्हणून काश्मिर फाईल्स चित्रपटाचा उल्लेख करावा लागेल. आता अग्निहोत्री यांनी या चित्रपटावरील माहितीपटाविषयी माहिती दिली आहे. त्याचा टीझर व्हायरल झाला आहे.

Also Read - Adhik Shravan Maas : अधिक श्रावण मास चित्तशुद्धीचा पर्वकाळ

अग्निहोत्री यांचा काश्मिर फाईल्स हा २०२२ मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यात काश्मिरी पंडितांचे स्थलांतर, त्यांना करावा लागलेला संघर्ष आणि त्यांच्या वाटेला आलेला अपमान याविषयीचे विदारक चित्रण करण्यात आले होते. देशभरातून काश्मिर फाईल्सला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. त्यावरुनही वादही तेवढ्याच प्रमाणात झाला होता. सध्या काश्मिर अनरिपोर्टेडचा टीझर प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

अग्निहोत्री यांनी या डॉक्यु सीरिजचा टीझर शेयर करताना ज्यांनी काश्मिर फाईल्सला प्रोपगंडा म्हटले त्यांच्यावर कडक शब्दांत निशाणाही साधला आहे. काही दिवसांपूर्वी अग्निहोत्री यांनी द व्हॅक्सिन वॉर या चित्रपटाची घोषणा केली होती. त्याचे चित्रिकरण आता पूर्ण झाले असून येत्या वर्षात हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. काश्मिर अनरिपोर्टेड हा काश्मिर फाईल्सची फॉलो अप स्टोरी असल्याचे सांगण्यात येत आहे.

ट्विटरवर अग्निहोत्री यांनी या माहितीपटाचा टीझर व्हायरल केला असून त्यात त्यांनी या एक मिनिटांच्या टीझरमधून काश्मिरी पंडितांची वेदना आणि संघर्ष किती जीवघेणा आहे हे त्यांच्याच तोंडून ऐका असे म्हटले आहे. यावेळी अग्निहोत्री यांनी कश्मिर फाईल्सला नावं ठेवणाऱ्यांनी आता या माहितीपटातून काही बोध घ्यावा. असे म्हटले आहे. Zee5 वर हा माहितीपट प्रदर्शित होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojna: लाडकी बहिण योजना सरकारनं तुर्तास थांबवली! काय आहे कारण? जाणून घ्या

Latest Maharashtra News Updates : दिवसभरात देश-विदेशात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

JioCinema: जिओ सिनेमा लवकरच बंद होणार! मुकेश अंबानी घेऊ शकतात मोठा निर्णय; काय आहे कारण?

Local Train Derailed : मुंबईत लोकल ट्रेनचा डबा रुळावरुन घसरला; प्रवाशांचा खोळंबा

Eknath Shinde Helicopter: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोडक्यात बचावले! हेलिकॉप्टरची इमर्जन्सी लँडिंग; काय घडलं नेमकं? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT