Katrina Kaif & Vicky Kaushal Google
मनोरंजन

कतरिना-विकीसोबत संपूर्ण कुटुंबाची कोर्टाकडे धाव; काय घडलं नेमकं?

कतरिना-विकी लग्नानंतर अवघ्या ३ महिन्यात कोर्टात गेल्याच्या बातमीनं चाहते टेन्शनमध्ये आले आहेत.

प्रणाली मोरे

कतरिना(Katrina Kaif)- विकी(Vicky Kaushal)च्या लग्नाला जेमतेम ३ महिने झाले आहेत. २०२१ च्या डिसेंबर महिन्यात राजस्थानमध्ये एकदम रॉयल अंदाजात हे दोन लव्हबर्ड्स लग्नबंधनात अडकले. त्यावेळी कोरानाच्या निर्बंधांचं पालन करीत त्यांनी जवळचे आप्तेष्ट आणि मित्र-परिवाराला निमंत्रित केलं होतं. यो दोघांच्या लग्नाची चर्चा लग्नानंतर जेवढी रंगली त्याहून अधिक लग्नाआधी रंगली. दोघे एकमेकांसोबत शूटिंगच्या व्यस्त शेड्युलमधून वेळ काढत एकमेकांसोबत रमताना अधनं-मधनं दिसतात. नुकताच त्यांनी होळीचा सणही आपल्या कुटुंबासोबत साजरा केला. अशा वेगवेगळ्या कारणांनी कतरिना-विकी चर्चेत येतात आणि त्यांच्या आनंदात चाहतेही सुखावतात. पण त्यांच्याबाबतीत काही दिवसांपूर्वी एक बातमी व्हायरल झाली अन् चाहत्यांच्या चेहऱ्यावर निराशा दिसू लागली.

बातमी होती, कतरिना-विकी कोर्टात दिसल्याची. दोघांचे कुटुंबियही त्यांच्यासोबत तिथे गेल्याची. त्यामुळे पहिलं तर कळालं नाही लग्नानंतर ३ महिन्यात सगळ्या कुटुंबासोबत कोर्टात जाण्याचं काय प्रयोजन. पण आता कारण समजतंय की लग्नानंतर कतरिना-विकी कामात व्यग्र असल्यामुळे त्यांच्या लग्नाची विवाह नोंदणी करायची राहून गेली होती. त्यामुळेच आपलं लग्न कायेदशीररित्या रजिस्टर करण्यासाठी १९ मार्च,२०२२ रोजी कतरिना-विकी कोर्टात गेले होते. आणि यावेळी लग्नाला उपस्थित आप्तेष्टांच्या सह्या लागतात म्हणून कुटुंबही त्यांच्यासोबत कोर्टात गेलं होतं. लग्न कोर्टात कायदेशीररित्या रजिस्टर झाल्यानंतर कतरिना-विकीनं कुटुंबासोबत त्या रात्री डिनर पार्टी एन्जॉय केली होती. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर सगळ्यांना खरं कारण कळालं. आणि तेव्हा कुठे कतरिना-विकीच्या चाहत्यांचा जीव भांड्यात पडला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

Ghatkopar East Assembly Election 2024 Result live : घाटकोपर पूर्व मतदार संघात भाजप आणि शरद पवार गटात दुहेरी लढत

Mira Bhaindar: Assembly Election 2024 Result Live: मिरा-भाईंदर मतदारसंघात सय्यद मुजफ्फर हुसेन विरुद्ध नरेंद्र मेहता

SCROLL FOR NEXT