बॉलिवूड कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी प्रेक्षक नेहमी उत्सुक असतात. कधी त्यांच्या अफेअरच्या तर कधी ब्रेक-अप विषयाच्या चर्चा सोशल मीडियावर होत असतात. गेल्या काही दिवसांपासून अभिनेता विकी कौशल (vicky kaushal) आणि अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) हे एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू होती. तर मध्यतंरी या दोघांचा साखरपुढा झाल्याच्या काही पोस्ट नेटेकऱ्यांनी शेअर केल्या होत्या. आणि आता हे दोघं लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत, अशी चर्चा सुरू आहे.
एका रिपोर्टमध्ये असे सांगण्यात येत आहे की, विकी आणि कतरिना डिसेंबर महिन्यामध्ये लग्न करणार आहेत. आणि त्यांचा विवाह सोहळा गुपचूपपणे पार पडणार असल्याचे सांगितले जात आहे. दोघांचे लग्नाचे आउटफिट सेलिब्रिटी डिझायनर सब्यसाची हे डिझाइन करणार आहेत. बॉलिवूडलाइफला दिलेल्या मुलाखतीत कतरिनाने सांगितले की, तिच्या आणि विकीच्या लग्नविषयाच्या बातम्यांमध्ये काहीही तथ्य नाही. या अफवा कशा सुरू झाल्या असे विचारले असता ती म्हणाली, "गेल्या १५ वर्षांपासून मलाही हा प्रश्न पडला आहे."
ऑगस्टमध्ये विकी आणि कतरिनाच्या साखपुडा झाला, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू होती. आता त्याच्या लग्नाबद्दल देखील अनेक जण सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत. पण अजूनही लग्नाबाबत आणि साखरपुड्याबाबत विकीने आणि कतरिनाने कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही. त्यामुळे त्यांचे चाहते याबाबत जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक आहेत. एका मुलाखतीमध्ये अभिनेता हर्षवर्धन कपूरने विकी आणि कतरिनाच्या नात्याबद्दल त्याचे मतं मांडले होते. त्याने सांगितले होते, 'विकी आणि कतरिना एकमेकांना डेट करत आहेत. आता हे सांगितल्यावर मला कोणत्या समस्येचा सामना करावा लागेल ते माहित नाही.'
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.