Vicky Kaushal, Katrina Kaif Instagram
मनोरंजन

कतरिनाच्या साखरपुड्याच्या अंगठीने वेधलं लक्ष; जाणून घ्या किंमत..

हुबेहूब प्रिन्सेस डायनाच्या अंगठीसारखी आहे डिझाइन

स्वाती वेमूल

अभिनेता विकी कौशल Vicky Kaushal आणि कतरिना कैफ Katrina Kaif यांनी सोशल मीडियावर लग्नसोहळ्याचे फोटो पोस्ट केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच ते व्हायरल झाले. या फोटोंमधील प्रत्येक बारिकसारिक गोष्ट नेटकऱ्यांनी निरखून पाहिली असून एका फोटोमधील कतरिनाच्या अंगठीची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. साखरपुड्याच्या अंगठीसाठी कतरिना-विकीने नीलम या रत्नाची निवड केल्याचं पहायला मिळत आहे. टिफनी या ब्रँडकडून त्यांनी सफायरची sapphire अंगठी घेतली आहे. नेहमीच्या सॉलिटेअर एंगेजमेंट रिंगची निवड न करता कतरिनाने प्रिन्सेस डायनासारख्या नीलम अंगठीला पसंती दिली आहे. प्रिन्सेस डायनाच्या निधनानंतर, ही शाही अंगठी त्यांची सून केट मिडलटनला देण्यात आली होती. 'टाइम्स ऑफ इंडिया'ने दिलेल्या वृत्तानुसार, या अंगठीची किंमत ही ७.४१ लाख रुपये आहे. (Katrina Kaif Engagement Ring)

लग्नसोहळ्यासाठी इतर बॉलिवूड सेलिब्रिटींप्रमाणेच विकी आणि कतरिनानेही फॅशन डिझायनर सब्यसाचीच्या कपड्यांनाच पसंती दिली. कतरिनाने लाल लेहंगा तर विकीने आयवरी सिल्क शेरवानी परिधान केली होती.

राजस्थानच्या सवाई माधोपूर इथल्या सिक्स सेन्सेस फोर्ट बरवारामध्ये विकी-कतरिनाचा शाही विवाहसोहळा पार पडला. 'आम्हाला या क्षणापर्यंत आणलेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल आमच्या अंतःकरणात फक्त प्रेम आणि कृतज्ञता आहे. आम्ही एकत्र या नवीन प्रवासाची सुरुवात करत असताना तुमचं प्रेम आणि आशीर्वाद राहू दे,' असं लिहित विकी-कतरिनाने सोशल मीडियावर लग्नाचे फोटो पोस्ट केले. प्रियांका चोप्रा, करिना कपूर खान, आलिया भट्ट, हृतिक रोशन, वरुण धवन, दीपिका पदुकोण, रणवीर सिंग यांसारख्या सेलिब्रिटींनी विकी-कतरिनावर शुभेच्छांचा वर्षाव केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT