'कौन बनेगा करोडपती १३' Kaun Banega Crorepati 13 या कार्यक्रमाला यंदाच्या पर्वात तिसरा कोट्यधीश मिळाला. मध्यप्रदेशच्या गीता सिंग गौर Geeta Singh Gour यांनी एक कोटी रुपये जिंकले. याआधी हिमानी बुंदेला आणि साहिल अहिरवार यांनी प्रत्येकी एक कोटी रुपये जिंकले होते. एक कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्यासाठी गीता यांनी १५ प्रश्नांची उत्तरं अचूक दिली. मात्र त्यानंतर सात कोटी रुपयांच्या प्रश्नाचं उत्तर त्यांना देता आलं नाही. कोणतीही लाइफलाइन वापरण्यासाठी शिल्लक नसल्याने अखेर त्यांनी खेळ तिथेच सोडण्याचा निर्णय घेतला.
गीता यांना जो जॅकपॉट प्रश्न विचारण्यात आला होता, तो मुघल सम्राट अकबरच्या नातवांबद्दल होता. "यापैकी कोणतं नाव अकबरच्या तीन नातवंडांची नाही, जेव्हा जेसूट धर्मगुरूंकडे सोपवल्यानंतर त्यांनी काही काळासाठी ख्रिस्ती धर्म स्वीकारला होता," असा प्रश्न अमिताभ बच्चन यांनी त्यांना विचारला. डॉन फेलिप, डॉन हेन्रिक, डॉन कार्लोस आणि डॉन फ्रान्सिस्को हे चार पर्याय देण्यात आले होते. अचूक उत्तराबद्दल खात्री नसल्याने गीता यांनी खेळ थांबवला. या प्रश्नाचं योग्य उत्तर डॉन फ्रान्सिस्को होतं.
"जहांगीर नास्तिक होता असं मानलं जातं. त्याने त्याचा भाऊ दानियाल मिर्झाच्या तीन मुलांना जेसुट धर्मगुरूंच्या स्वाधीन केलं होतं. क्रॉस आणि पोर्तुगीज कपडे परिधान करून तिघांनी आग्राभोवती परेड केलं होतं. त्यांची नावंदेखील बदलली गेली होती. तहमुरास डॉन फेलिप, बायसुंघर डॉन कार्लोस आणि हुशांग डॉन हेन्रिक अशी नावं ठेवली गेली. मात्र काही महिन्यांनंतर, त्यांनी पुन्हा इस्लाम धर्म स्वीकारला,” अशी माहिती अमिताभ यांनी गीता यांना दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.