Kaun Banega Crorepati 14 And Amitabh Bachchan  esakal
मनोरंजन

KBC 14 : 'कौन बनेगा करोडपती'त नवीन बदल, बच्चन यांचा शो असेल हटके

सकाळ डिजिटल टीम

Kaun Banega Crorepati 14 : कौन बनेगा करोडपती पर्व १४ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चाहत्यांना उत्सुकता आहे, की अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) असलेल्या या मालिकेत यंदा काय नवीन आणि विशेष पाहायला मिळणार? दिग्दर्शक अरुण शेषकुमार यांनी एका मुलाखतीत आगामी पर्वाबाबत सर्व प्रश्नांची उत्तर दिली. ते म्हणाले, केबीसी एक असा शो आहे जेथे तुमचे टॅलेंट तुमचे नाॅलेज आहे. तुमचे टॅलेंट तुमचे नशीब आहे. आयएएनएस वृत्तसंस्थेशी बोलताना केबीसीचे दिग्दर्शकांनी सांगितले, या नवीन पर्वात रक्कम पूर्वीपेक्षा वाढवण्यात आली आहे. या पर्वात आणखी एक नवीन सुरुवात असेल त्यामुळे स्पर्धकाला ७५ लाख रुपये सहज जिंकता येऊ शकेल. आता शोमध्ये सर्वाधिक रक्कम ७.५ कोटी रुपये जिंकता येईल. आतापर्यंत केबीसीमध्ये केवळ ७ कोटी रुपये जिंकले जाऊ शकत होते. (Kaun Banega Crorepati 14 Amitabh Bachchan Show New Things)

लाईफलाईन आणि घर बसल्या प्रेक्षकांसाठी हे असतील बदल

या पर्वात घरी बसून खेळणाऱ्या प्रेक्षकांची विजय किंवा पराभवाचा निर्णय तात्काळ लागणार असल्याचे संकेत शेषकुमार यांनी दिले. लाईफलाईन्स आता १४ व्या पर्वात एकूण ३ लाईफलाईन्स असतील. ऑडियन्स पोल, व्हिडिओ अ फ्रेंड आणि फिफ्टी-फिफ्टीमुळे आणखी रंगत वाढणार आहे. (Entertainment News)

केबीसीत तुमचे ज्ञानच तुमचे टॅलेंट

तुम्हाला गायन, नृत्य आणि आणखी अधिकचे टॅलेंट असेल तर त्याची गरज नाही. तुम्ही काय वाचले आहे आणि काय वाचत आहात तेच ज्ञान तुम्हाला या मंचापर्यंत घेऊन येईल, असे शेषकुमार म्हणाले.

पर्वाच्या सुरुवातीलाच एक खास पाहुणा येणार !

यंदाच्या पर्वात स्वातंत्र्याचे ७५ वर्षांची झलक दिसणार आहे. हाॅटसीटवर बसणारे आणि घर असलेल्यांसाठी खूपच नवीन पाहायला मिळणार आहे, असे अरुण शेषकुमार म्हणाले. सात ऑगस्ट रोजी आझादी के गर्व का महापर्व नावाने एक एपिसोड दाखवला जाणार असून त्यात एक विशेष पाहूणाही येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump Third Attack: ट्रम्प यांच्यावर पुन्हा जीवघेणा हल्ला? राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूक रॅलीत नेमकं काय घडलं?

Tirupati Laddu Controversy: तिरुपती देवस्थानच्या लाडूमध्ये चरबीच! NDDB CALF लॅबच्या रिपोर्टने खळबळ; विनोद तावडेंनीही केलं ट्वीट

state co-operative bank: राज्य सहकारी बँक कर्मचाऱ्यांना आजीवन पेन्शन मिळणार; 'एवढ्या' कर्मचाऱ्यांना होणार फायदा

Third Front In Maharashtra: विधानसभा निवडणुकीसाठी आता तिसराही पर्याय! बच्चू कडू, संभाजीराजे, राजू शेट्टी आले एकत्र

Waqf Board JPC Meeting: 'वक्फ बोर्ड'संबंधीच्या 'जेपीसी'त मोठी खडाजंगी; मेधा कुलकर्णी 'आप'च्या खासदारावर संतापल्या; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT