Kaun Banega Crorepati 14: टीव्ही मनोरंजन विश्वामध्ये नेहमीच आपल्या वेगळेपणासाठी परिचित असणारा शो म्हणून कौन बनेगा करोडपतीकडे पाहिले (Tv Entertainment News) जात आहे. गेल्या काही दिवसांपासून हा शो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आतापर्यत अनेकांनी या कार्यक्रमातून आपले नशीब आजमावले आहे. आयुष गर्गचा एपिसोड सोशल मीडियावर लाखो नेटकऱ्यांचे लक्ष (Social media news) वेधून घेताना दिसत आहे. त्याला एक कोटींसाठी प्रश्न (Viral News) विचारण्यात आला. त्यावेळी सगळ्यांना अपेक्षा होती ती म्हणजे आयुषला एक कोटी रुपये मिळणारच. मात्र तसे झाले नाही. त्या प्रश्नाचे उत्तर त्याला काय देता आले नाही.
कौन बनेगा करोडपतीचा सध्या 14 वा सीझन सुरु झाला आहे. त्यातील स्पर्धक आयुष गर्गला 75 लाख रुपयांवर समाधान मानावे लागले आहे. यापूर्वी आयुष चर्चेत आला तो ऑनलाईन डेटिंगच्या प्रश्नावरुन. केबीसीमध्ये सहभागी होणारे स्पर्धक हे आपल्या नातेवाईकांना घेऊन जातात. आयुष हा त्याच्या गर्लफ्रेंडलाच घेऊन गेला होता. ही गोष्ट अमिताभ यांना सांगितल्यावर त्यांनी आयुषला तुमची ओळख कशी झाली असा प्रश्न विचारला. त्यावर आयुषनं ऑनलाईन डेटिंग अॅप. यावेळी अमिताभ यांनी आयुषला आपल्याला ऑनलाईन डेटिंग अॅप म्हणजे काय आणि ते कसे काम करते याविषयी विचारले होते. दोघांमधील तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
आयुषचा खेळ पाहून अमिताभ यांनी त्याला तू एक कोटी रुपये जिंकू शकतोस असं सांगितलं होतं. त्याला एक कोटींसाठी प्रश्न विचारला खरा. मात्र त्या प्रश्नाचे उत्तर त्याला काही जमलेच नाही. दिल्लीत राहणाऱ्या आयुषचं वय 27 इतकं असून तो एका इ कॉमर्स कंपनीमध्ये काम करतो. 8 हजारांपेक्षा जास्त उंची असणारा असा कोणता पर्वत आहे ज्यावर पहिल्यांदा मानवानं गिर्यारोहण केले. या प्रश्नासाठी आयुषला अन्नपुर्णा, ल्होत्से, कांचनगंगा आणि मकालू असे पर्याय दिले होते. मात्र त्यानं लोत्ह्से हे उत्तर दिलं. या प्रश्नाचं उत्तर अन्नपूर्णा हे होतं.
शेवटी आयुषला 75 लाख रुपये घेऊन जावं लागलं. मात्र त्याच्या व्यक्तिमत्वावर अमिताभ खुश झाले. त्याला भेटून आणि त्याच्याशी संवाद साधून आपल्याला आनंद वाटला असे त्यांनी सांगितले. गेल्या काही दिवसांपासून आयुष आणि अमिताभ बच्चन यांच्यातील प्रश्नोत्तराचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हाय़रल झाले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.