Kaun Banega Crorepati 15 Mayank becomes first junior contestant to win 1 Crore Esakal
मनोरंजन

KBC 15 : मयंक ठरला कौन बनेगा करोडपती 15 ज्युनियरचा पहिला करोडपती!

KBC 15: Mayank became the first junior millionaire!

Vaishali Patil

Kaun Banega Crorepati 15: टीव्ही मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध रियॅलिटी शो कौन बनेगा करोडपती सध्या चर्चेत आहे. हा शो गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन तर करतच आहे मात्र त्याबरोबरच त्यांच्या ज्ञानात भरही घालत आहे.

'कौन बनेगा करोडपती 15' मध्ये आता 'केबीसी ज्युनियर्स वीक'सुरु आहे. जेथे अनेक लहान आणि खुप हूशार मुलं या शोचा भाग बनत आहेत.

आता या शो ला त्याचा पहिला ज्युनियरचा करोडपती मिळाला आहे. तो स्पर्धक आहे हरियाणातील महेंद्रगड येथील मयंक. १३ वर्षांच्या मयंकने हॉट सीटवर आपली जागा आणि आपल्या हूशारीने रक्कमही जिंकली.

मयंक अवघ्या १३ वर्षांचा असून तो एक कोटी रुपये जिंकणारा सर्वात लहान स्पर्धक बनला आहे. त्याने 1 कोटी रुपयांच्या प्रश्नाचे उत्तर दिले.

बिग बींनी मयंकला 1 कोटी रुपयांचा प्रश्न विचारला, तो प्रश्न होता - ज्या नकाशात नव्याने सापडलेल्या मालदीवला 'अमेरिका' असे नाव देण्यात आले होते त्या नकाशाचे श्रेय कोणत्या युरोपियन कार्टोग्राफरला दिले जाते?

अ) अब्राहम आर्टिलियस

ब) Gerardus Mercator

क) Giovanni Battista Agrisi

ड) मार्टिन वाल्डसीमुलर

या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी, मयंकने लाइफलाइनचा वापर केला होता. या प्रश्नाचे उत्तर डी म्हणजे मार्टिन वाल्डसीमुलर होते. जे उत्तर मयंकने बरोबर दिले. या प्रश्नाच्या उत्तरासोबत त्याने 1 कोटी रुपये जिंकले आहेत.

यानंतर मयंक KBC 15 7 कोटीच्या प्रश्नापर्यंत पोहचला. मात्र मयंक या प्रश्नाचे उत्तर देवू शकला नाही. सात कोटींसाठी त्याला प्रश्न विचारण्यात आला होता तो म्हणजे सुभेदार एन.आर. निक्कम आणि हवालदार गजेंद्र सिंग यांना दुसऱ्या महायुद्धात कोणत्या शहरात साहित्य पोहोचवल्याबद्दल रशियाने ऑर्डर ऑफ रेड स्टारने सन्मानित केले होते?

अ) तबरीझ

ब) सिडोन

क) बटुमी

ड) अल्माटी

या प्रश्नाचे उत्तर होते अ) तबरीझ. मात्र या प्रश्नाचे उत्तर देताना मयंक जरा गोंधळलेला दिसला. त्याने खूप विचार केला, पण त्याला याचे उत्तर माहित नव्हते. त्यामुळे त्याने शो सोडण्याचा निर्णय घेतला आणि तो 1 कोटींची रक्कम घेऊन घरी जाण्याचा निर्णय घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election: देशात 'चार सौ पार'ला फटका! आता महाराष्ट्रात भाजप ‘बटेंगे तो कटेंगे’मुळे बॅकफूटवर

Priyanka Gandhi: प्रियंका गांधींच्या नागपूरमधील रॅलीत मोठा राडा, काॅंग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने आले अन्....

"Fake Narrative फार काळ टिकत नाही"; पंतप्रधान मोदींनी केलं विक्रांत मेस्सीच्या द साबरमती रिपोर्टचं कौतुक

Vikramgad Assembly constituency 2024 : स्थलांतरीत मजुरांमुळे मतदानाची टक्केवारी घटण्याची शक्यता, उमेदवारांपुढे आव्हान.

Sharad Pawar: बारामतीत शरद पवारांच्या सभेपूर्वी नाट्यमय घडामोडी, प्रतिभा पवारांना टेक्सटाईल पार्कमध्ये जाण्यापासून अडवले, पहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT