KBC14: Amitabh Bachchan scared about 'Uunchai' movie, request to audience.  Google
मनोरंजन

KBC14: 'मी हात जोडतो पण...', भावूक झालेल्या अमिताभचं केबीसीच्या मंचावरनं लोकांना आवाहन

अमिताभ बच्चन यांचा केबीसी १४ हा शो सध्या स्पर्धकांसोबतच अमिताभ यांच्या वैयक्तिक आयुष्यातील खुलाशांमुळे चर्चेत आला आहे.

प्रणाली मोरे

KBC14: अमिताभ बच्चन त्या बॉलीवूड कलाकारांपैकी एक आहेत जे वर्षाला पाच ते सहा सिनेमे करतात. यावर्षी देखील अमिताभ बच्चन यांचे ६ सिनेमे रिलीज झाले आणि आता सातवा 'उंचाई' सिनेमा रिलीजच्या वाटेवर आहे. सुरज बडजात्यांचा हा सिनेमा ११ नोव्हेंबर रोजी रिलीज होत आहे. पण अमिताभच्या मनात या सिनेमाविषयी भीतीच्या भावना आहेत. सांगायचं झालं तर, यावर्षी जेवढे हिंदी सिनेमे बॉक्सऑफिसवर रिलीज झाले त्या सगळ्यांचीच अवस्था वाईट होती आणि हिच भिती पुन्हा अमिताभना सतावतेय. (KBC14: Amitabh Bachchan scaredabout 'Uuncha'i movie, request to audience.)

हेही वाचा: बातम्या, टिप्सचा गुंतवणुकीवर नका होऊ देऊ परिणाम

हाताच्या बोटावर मोजण्याइतके सिनेमे सोडले तर बऱ्यापैकी सिनेमांना बॉक्सऑफिसवरनं लवकर गाशा गुंडाळावा लागला. अमिताभ यांचाच काही दिवसांपूर्वी रिलीज झालेला 'गुडबाय' सिनेमा बॉक्सऑफिसवर फ्लॉप झाला. अशामध्ये अमिताभ बच्चन यांना आता चिंता सतावत आहे की, 'उंचाई' सिनेमा पहायलाही प्रेक्षक आलेच नाहीत तर?,सिनेमा चालला नाही तर?' या भीतीमुळेच बिग बी यांनी 'उंचाई' सिनेमाच्या रिलीज आधी प्रेक्षकांना सिनेमा पहायची हात जोडून विनवणी केली आहे.

अमिताभ बच्चन यांनी आपल्या मनातील भीती 'कौन बनेगा करोडपती १४' च्या सेटवर बोलून दाखवली आणि लोकांना 'उंचाई' पाहण्याची विनंती देखील याच मंचावर अमिताभनी केली. हात जोडून लोकांना अमिताभनी आवाहन केलं आहे. ते म्हणाले,''मी हात जोडतो पण 'उंचाई' सिनेमा हा थिएटरमध्ये जाऊन पहा''.

अमिताभ बच्चन म्हणाले, ''थिएटरमध्ये जाऊन,तिकीट खरेदी करून सिनेमा पाहण्यात जो आनंद आहे,तो मी शब्दात सांगू शकत नाही. कृपया थिएटरमध्ये जाऊन 'उंचाई' पहा. आजकाल सिनेमा चालवण्यासाठी खूप आटापिटा करावा लागतोय. कोणी जातच नाहीय थिएटरमध्ये. हात जोडतो मी,तिकीट खरेदी करुन थिएटरमध्ये सिनेमा पहा''.

'उंचाई' सिनेमात अमिताभ बच्चन,नीना गुप्ता,अनुपम खेर आणि बोमन ईराणी व्यतिरिक्त डॅनी देखील आहेत. सिनेमा चार मित्रांच्या मैत्रीचं कथानक आपल्यासमोर मांडतो. एका मित्राचं माउंट एव्हरेस्ट सर करण्याचं स्वप्न असतं पण त्याचं निधन होतं अन् ते स्वप्न अर्धवट राहतं. तेव्हा उरलेले ३ मित्र आपल्या त्या मृत मित्राचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्या वार्धक्याचा विचार न करता माऊंट एव्हरेस्ट सर करायचं ठरवतात. सिनेमात परिणिती चोप्राची मुख्य भूमिका आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT