KBC14: this happened first time in 22 years on Kbc 14. Google
मनोरंजन

KBC14: 22 वर्षात असं पहिल्यांदाच घडत होतं; स्पर्धक बोलत होता अन अमिताभ फक्त ऐकत होते...

केबीसी 14 हा रिअॅलिटी शो अमिताभसोबत स्पर्धकांच्या विविध अनुभवांनी अधिक चर्चेत येताना दिसत आहे.

प्रणाली मोरे

KBC 14: बॉलीवूडचे शहंशाह अमिताभ बच्चन आपल्या केबीसी शो मुळे नेहमीच चर्चेत पहायला मिळतात. अमिताभ नेहमीच आपल्या शो मध्ये अनेक गोष्टींचा खुलासा करताना दिसतात. ते अनेकदा आपल्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित अनेक गोष्टी बोलून दाखवतात. गेल्या एका भागात अमिताभनी एक मोठा खुलासा केला होता. मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्या कौन बनेगा करोडपती शो च्या २२ वर्षाच्या इतिहासात डॉ. समित सेन पहिले स्पर्धक असतील,जे अंदमान -निकोबार द्वीप समूहावरनं आले असतील. अमिताभनी स्वतः याविषयी माहिती देत आपणही एकदा इथं गेलो आहोत असं यावेळी नमूद केलं.(KBC14: this happened first time in 22 years on Kbc 14)

बिग बी म्हणाले, ''केबीसीच्या २२ वर्षांच्या इतिहासात डॉ. समित अंदमान निकोबारहून आलेले पहिले स्पर्धक आहेत''. २८ वर्षीय समित राम मनोहर लोहिया मेडिकल कॉलेज नवी दिल्लीतून मायक्रोबायोलॉजीमध्ये मास्टर करत आहेत. त्यांनी अमिताभना सांगितलं की त्यांचे होम टाऊन असलेल्या पोर्ट ब्लेअरमध्ये टी.व्हीवर खूप कमी चॅनल दाखवले जातात,लोकांना केबीसी पहायचं असतं पण पाहता येत नाही या कारणानं. एकदा अमिताभ तिथे आल्याची अफवा देखील पसरली होती असं समित म्हणाले. यावर अमिताभनी मान हलवली आणि म्हटलं की,''हो,एकदा मी आलो होतो''.

त्यानंतर डॉ.समित सेन यांनी तिथल्या सेंटिनस द्वीप संदर्भात भाष्य केलं. ते माहिती देताना म्हणाले,''१९४३ सालात जेव्हा स्वांतत्र्य सेनानी सुभाष चंद्र बोस यांनी द्वीपसमुहांची घोषणा केली अन् द्वीप समूहावर सर्वप्रथम भारताचा झेंडा फडकावला, तेव्हा ते पहिलं भारतीय क्षेत्र ठरलं होतं जे ब्रिटिशांच्या शासनातून मुक्त झालं''.

डॉ.समित सेन पुढे म्हणाले, ''अंदमान आणि निकोबार द्वीप समुह माझी ओळख आहेत कारण मी तिथे जन्मलो. आणि नॅशनल टेलीव्हिजनवर द्वीप समुहांचे प्रतिनिधित्व करताना मला खूप अभिमान वाटत आहे. केबीसीच्या हॉट सीटवर बसून खेळणं माझ्यासाठी स्वप्नापेक्षा कमी नाही. अमिताभ बच्चनसमोर बसणं आणि माझ्या होमटाऊन विषयी बोलणं माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. माझ्या कायम लक्षात राहील ही आठवण''. डॉ. समित सेन यांच्याकडून द्वीप समुहांचा इतिहास ऐकताना अमिताभ एवढे भारावले होते की ते शांत राहून केवळ समित यांना ऐकत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT