kedar shinde shared post about raining in october and Suffering common people  sakal
मनोरंजन

Kedar Shinde: आधीच सामान्य माणसाचं कंबरडं मोडलय अन् तुम्ही.. केदार शिंदेंनी थेट फोनच लावला

दिग्दर्शक केदार शिंदे यांची सामान्य माणसासाठी साद, बघाच काय म्हणाले..

नीलेश अडसूळ

kedar shinde: दिग्दर्शक केदार शिंदे (kedar shinde) यांनी आजवर रंगभूमीवर भरीव योगदान दिले आहे. त्यांची नाटकं असो किंवा चित्रपट, प्रेक्षक भान हरपून त्यात समरस होतो. आजोबा शाहीर साबळे यांच्याकडून आलेला लोककलेचा वारसाही त्यांनी जपला आहे. शाहीर साबळे यांचे जीवनावर आधारित 'महाराष्ट्र शाहीर' (maharashtra shahir) हा त्यांचा चित्रपट लवकरच प्रेक्षक भेटीला येणार आहे. केदार शिंदेंकडे अनुभवांचा खजीना आहे. त्यांच्याशी गप्पा करताना ते अनेक किस्से रंगवत असतात. शिवाय सामान्य माणसांच्या अडचणी त्यांना होणारा त्रास याविषयीही त्यांना प्रचंड आस्था आहे. आज त्याच सामान्य माणसासाठीच त्यांनी एक पोस्ट केली आहे. टई पाहून तुम्हालाही त्यांचा अभिमान वाटेल. (Entertainment news)

(kedar shinde shared post about raining in october and Suffering common people)

सध्या राज्याभरात पावसाने धुमाकूळ घातला आहे. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. राज्यातील कैक जिल्ह्यात पिकांचे लाखों रुपयांचे नुकसान झाले आहे. शिवाय शहरी भागातही उत्सवाचा काळ असल्याने पावसामुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे सामान्यांचे होणारे हाल लक्षात घेऊन दिग्दर्शक केदार शिंदे यांनी एक आर्जव केली आहे.

हातामध्ये फोन घेऊन केदार शिंदे (kedar shinde) कुणाशी तर बोलत असल्याचा एक फोटो त्यांनी शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी सामान्य माणसांचं दुःख मांडलं आहे. परंतु हा संवाद कोणत्या राजकीय नेत्याशी नाही तर थेट वरुणराजाशी म्हणजे पावसाशी साधला आहे. ते म्हणतात, 'हॅलो वरूणराजा.. आता बास करा की.. आधीच २ वर्षात परीस्थिती बिकट म्हणून सर्वसामान्य माणसाचं कंबरडं मोडलय.. आणि तुम्ही रोज हजेरी लावून सगळ्या स्वप्नांवर पाणी ओतताय.. प्रत्येक गोष्ट त्या त्या सीझनला झालेली चांगली असते. पाऊस हवाच हो.. पण तो आता या महिन्यात नको.. आणि पुढेही नको..' त्यांची ही पोस्ट सध्या बरीच व्हायरल होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात विजयी मिरवणूक काढण्यास सक्त मनाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: शायना एन सी सिद्धिविनायकाच्या दर्शनाला पोहोचल्या

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

Versova Assembly Constituency Result: भारती लव्हेकर विरुद्ध हारून खान

SCROLL FOR NEXT