kedar shinde new movie maharashtra shahir: दिग्दर्शक केदार शिंदे (kedar shinde) म्हणजे मराठी रंगभूमीवरील एक दिग्गज व्यक्तीमत्त्व. नाटक, मालिका, चित्रपट सर्वच स्तरावर त्यांचे भरीव योगदान आहे. सध्या त्यांची बरीच चर्चा आहे, कारण 'बाईपण देगा देवा' आणि 'महाराष्ट्र शाहीर' असे त्यांचे लोक दमदार चित्रपट लककरच प्रदर्शित होणार आहे. याच निमित्ताने केदार शिंदेने एक पोस्ट शेयर केली आहे. या पोस्टमुळे सर्वांचीच उत्कंठा वाढली आहे.
(kedar shinde shared post on upcoming Maharashtra Shahir movie said 100 days to go)
हेही वाचा : शेअर बाजारात सततचे लाॅसेस? मग यापैकी कुठली चूक होतेय? घ्या जाणून
शाहीर साबळे यांच्या जीवनावर केदार शिंदे 'महाराष्ट्र शाहीर' हा चित्रपट करत आहे. या चित्रपटाची केली वर्षभर बरीच चर्चा आहे. या चित्रपटात अभिनेता अंकुश चौधरी शाहीर साबळे यांच्या भूमिकेत असणार आहे. या चित्रपटाचे संगीत अजय अतुल करत आहे, शिवाय केदार शिंदे गेली काही दिवस शाहीर साबळे यांचे अनेक किस्से शेयर करत आहेत. त्यामुळे या चित्रपताबाबत चांगलीच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आता लवकरच हा चित्रपट आपल्या भेटीला येणार आहे.
याच विषयी केदार शिंदे म्हणतात, ''एका सिनेमासाठी ३ वर्ष तयारी करताना काळ किती भरभर निघून जातो हे कळतच नाही.. कालचीच गोष्ट वाटते जेव्हा ही कल्पना डोक्यात आली.. आता आतच तर स्क्रिप्ट वर काम सुरू होतं.. लोकेशन शोधायला फिरलो त्याची माती अजूनही बुटांवर आहे आणि महाराष्ट्रातल्या अनेक देवळांची दर्शनं घेतली त्याची फुलं सुद्धा सुकली नसतील..''
''हे सगळं शक्य झालं ते दोन गोष्टींमुळे - १) शाहीर साबळे म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचे बाबा, ह्यांच्यावर आणि त्यांच्या कार्यावर असलेलं प्रेम आणि २) तुम्हा मायबाप रसिक प्रेक्षकांना काहीतरी दर्जेदार आणि उत्तम देण्याची असलेली इच्छा.. ह्या प्रवासातला एक महत्वाचा टप्पा आलेला आहे.. एक बहुआयामी कलावंत असणाऱ्या शाहिरांचा झंझावाती जीवनपट 'महाराष्ट्र शाहीर' पडद्यावर येण्यासाठी अजून फक्त १०० दिवस बाकी आहेत.. भेटू लवकरच.. फक्त सिनेमागृहात!!'' असं त्यांनी लिहिलं आहे.
या चित्रपटात शाहीर साबळे यांच्या पत्नीची भूमिका केदार यांची मुलगी सना शिंदे तर आजीची भूमिका अभिनेत्री शुभांगी सदावर्ते साकारणार आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण ही देखील या चित्रपटातून समोर येणार आहेत. अभिनेता अतुल काळे ही यशवंतराव चव्हाणांच्या भूमिकेत असतील. तर आता महाराष्ट्र घडवण्यामध्ये ज्यांचा मोलाचा वाटा असे साने गुरुजी यांच्या भूमिकेत अभिनेता अमित डोलावत आहे. 28 एप्रिल 2023 रोजी हा .चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.