Kerala State OTT Platform news esakal
मनोरंजन

Kerala State OTT Platform : केरळ राज्य सरकारनं सुरू केला 'ओटीटी प्लॅटफॉर्म'! जाणून घ्या काय आहे नियमावली?

केरळ राज्य सरकारच्या 'त्या' निर्णयाची (Kerala State OTT Platform) चर्चा होताना दिसत आहे.

युगंधर ताजणे

Kerala State Government Now start OTT Platform : मनोरंजन क्षेत्रामध्ये केरळ सरकारने आज महत्त्वपूर्ण पाऊल टाकताना ‘सीस्पेस’ या ओटीटी प्लॅटफॉर्मला सुरूवात केली. स्वतःचा ओटीटी प्लॅटफॉर्म सुरू करणारे केरळ हे देशातील पहिलेच राज्य बनले आहे. ‘या प्लॅटफॉर्मुळे मल्याळी सिनेमाला एक निर्णायक वळण मिळू शकेल,’ असा विश्वास मुख्यमंत्री पी. विजयन यांनी प्लॅटफॉर्मच्या उद्‍घाटनप्रसंगी बोलताना व्यक्त केला. या प्लॅटफॉर्मचे नियंत्रण केरळ राज्य चित्रपट विकास महामंडळाकडे (केएसएफडीसी) असेल.

मुख्यमंत्री पी. विजयन म्हणाले की, ‘‘ मुख्य चित्रपट उद्योगाला क्षती न पोचविता प्रादेशिक चित्रपट आणि सांस्कृतिक मूल्यांना प्राधान्य देण्यात येईल. खासगी ओटीटी प्लॅटफॉर्मचा उद्देश केवळ नफा कमावणे हा असल्याने त्यावरून तशाच प्रकारचे चित्रपट आणि मालिका प्रसारित करण्यात येतात.

‘सीस्पेस’च्या माध्यमातून घरातील सर्वच सदस्यांना एकत्र बसून पाहता येणारे कार्यक्रम दाखवू. बहुतांश ओटीटी प्लॅटफॉर्मवर जगामध्ये ज्या भाषा सर्वाधिक बोलल्या जातात केवळ त्याच भाषांतील कार्यक्रमांना प्राधान्य देण्यात येते. प्रादेशिक पातळीवरील कलात्मक आणि सांस्कृतिक मूल्यांना मुख्य प्रवाहात आणणाऱ्या कार्यक्रमांचे आमच्या प्लॅटफॉर्मवरून प्रसारण करण्यात येईल. मल्याळी भाषा आणि सांस्कृतिक मूल्ये यांचा प्रचार या प्लॅटफॉर्मवरून करण्यात येईल.’’

चित्रपट उद्योगावर परिणाम नाही

जे चित्रपट याआधीच रिलीज झाले आहेत तेच चित्रपट या प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळतील त्यामुळे मुख्य चित्रपट उद्योगावर त्याचा कसल्याही प्रकारचा परिणाम होणार नाही. चित्रपट निर्माते आणि प्रदर्शित करणारे यांच्या हिताला कोणत्याही प्रकारची बाधा न आणता चांगल्या चित्रपटाला प्रोत्साहन देण्याचे काम करण्यात येईल. ज्या चित्रपटांना प्रादेशिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सन्मान मिळाले आहेत तेच चित्रपट या प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळतील.

याबाबत माहिती देताना केएसएफडीसीचे अध्यक्ष शाजी एन म्हणाले की, या प्लॅटफॉर्ममुळे चित्रपट निर्मात्यांना क्राउड फंडिंगचा मार्ग मोकळा होईल. चित्रपटांना मिळणारा नफा आणि त्यांना लाभलेली दर्शकसंख्या यामध्येही पारदर्शकता येऊ शकेल.

आधी चित्रपटाचे मूल्यमापन

या फ्लॅटफॉर्मवरून नेमके कोणते चित्रपट प्रसारित केले जावेत, हे ठरविण्यासाठी साठ सदस्यांचे एक वेगळे मंडळ नियुक्त करण्यात आले आहे. कोणताही चित्रपट या प्लॅटफॉर्मवर येण्याआधी त्याचे कलात्मक अंगाने मूल्यमापन करण्यात येईल त्यानंतरच तो अपलोड करायचा की नाही याचा निर्णय घेतला जाईल.

....

पहिल्या टप्प्यात काय पाहता येणार?

३५ चित्रपट, ६ माहितीपट, १ लघूपट, या प्लॅटफॉर्मवर चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांना पैसे मोजावे लागतील. एका चित्रपटासाठी साधारणपणे ७५ रुपये एवढे शुल्क द्यावे लागेल. माहितीपट आणि लघूपटासाठी तुलनेने कमी शुल्क आकारले जाईल. यातील अर्धी रक्कम कंटेंट प्रोव्हायडरला मिळू शकेल. या प्लॅटफॉर्मचे ‘सीस्पेस’ हे अॅप प्लेस्टोअर आणि अॅपस्टोअरमधून डाउनलोड करता येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बाळासाहेबांची मोठी भूमिका, पंतप्रधानांचा थेट सदानंद सुळेंना फोन... सुप्रिया सुळेंनी सांगितला लग्नाचा 'तो' किस्सा!

Share Market Opening: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण; सेन्सेक्स- निफ्टी लाल रंगात

'राज्यात पुन्हा महायुतीचीच सत्ता येणार, ते कोणी माई का लालही रोखू शकणार नाही'; अजितदादांचा कोणाला इशारा?

Gold Price: ओमान, यूएई, कतार आणि सिंगापूरच्या तुलनेत भारतात सोन्याचे भाव कमी; काय आहे कारण?

Mumbai Traffic: मुंबईच्या रस्ते वाहतुकीत उद्यापासून बदल, जाणून घ्या महत्त्वाची बातमी

SCROLL FOR NEXT