Ketaki Chitale Marathi Celebrity Insta Post esakal
मनोरंजन

Ketaki Chitale : 'कितीही शिव्या घाला पण मी....'! हर हर महादेव म्हणत केतकीची ललकार

सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत असणाऱ्या सेलिब्रेटींपैकी एक नाव म्हणजे केतकी चितळे.

युगंधर ताजणे

Ketaki Chitale Marathi Celebrity Insta Post : सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत असणाऱ्या सेलिब्रेटींपैकी एक नाव म्हणजे केतकी चितळे. केतकी अनेकदा तिच्या पोस्टमुळे चर्चेत येते. बातमीचा विषय होते. आपल्याला जे वाटते ते खमकेपणानं आणि तितक्याच परखडपणानं सांगण्यात ती अग्रेसर असते. यामुळे तिला कित्येकदा ट्रोलही व्हावे लागले आहे.

केतकीनं तिला आजवर जे ट्रोल करण्यात आले, नेटकऱ्यांकडून अपमानस्पद शब्दांत हिणवण्यात आले त्यांना त्याच भाषेत उत्तर दिले आहे. केतकीची सध्याची पोस्ट यावरुन तिला काय म्हणायचे हे नेमकेपणानं सांगण्याचा प्रयत्न केला आहे. त्या पोस्टवर आलेल्या प्रतिक्रियेतून पुन्हा एकदा केतकीला ट्रोल करण्यात आले आहे. यापूर्वी देखील तिला तिच्या पोस्टमुळे नेटकऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं आहे.

Navratri 2023 : तलवारीचं 'स्त्री'त्त्व आणि आदिमायेच्या गुणतत्त्वांचा सहसंबंध काय आहे?

केतकीनं आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, किती ही बडबड करा, शिव्या घाला, खोट्या तक्रारी नोंदवण्याचा धमक्या द्या, खोट्या तक्रारी नोंदवा, खोट्या केसेस ठोका माझ्या विरूद्ध, पण मी माझा सत्याचा मार्ग सोडणार नाही. तुम्हाला सत्य पचन नाही, म्हणून मी बोलणे बंद करणार नाही. हर हर महादेव... अशा शब्दांत केतकीनं तिची भूमिका मांडली आहे.

केतकीनं यापूर्वी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर केलेली आक्षेपार्ह टिप्पणी यामुळे तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर सोशल मीडियातून केतकीवर नेटकऱ्यांनी तीव्र शब्दांत आगपाखडही केली होती. यावेळी देखील केतकीनं तिची भूमिका ठामपणे मांडली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baba siddiqui case: बाबा सिद्दीकींच्या हत्येचा कट रचणाऱ्या शुभम लोणकरच्या निशाण्यावर पुण्यातील बडा नेता; पोलिस तपासात धक्कादायक माहिती

Mumbai Temperature: मुंबईच तापमान पुन्हा वाढलं, कमाल तापमान ३६.८ अंशांवर

Government Job: जिल्हा परिषद भरतीमध्ये घोळ? 19 नोव्हेंबरपर्यंत स्पष्टीकरण सादर करण्याचे कोर्टाचे आदेश

इलेक्शन ड्युटी नाकारणाऱ्या ८७२ कर्मचाऱ्यांना नोटिसा! प्रशिक्षणालाही दांडी, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी काढली यादी; आता दाखल होणार गुन्हे अन्‌ शिस्तभंगाची कारवाई

Latest Maharashtra News Updates : गृह मतदान मोहिमत ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांनी बजावला मतदानाचा हक्क

SCROLL FOR NEXT