Ketaki Mategaonkar expresses concern about air pollution in mubai share post Requested Municipal Corporation Bmc Esakal
मनोरंजन

Ketaki Mategaonkar: "एक जागृत नागरीक म्हणून..",केतकी माटेगावकरची थेट मुंबई महापालिकेला विनंती! 'या' गंभीर समस्येमुळे मनस्ताप

Vaishali Patil

गेल्या काही आठवड्यांपासून मुंबईतील वातावरण चिंतेचा विषय ठरलं आहे. मुंबईत वायू प्रदूषणाची पातळी दिवसेंदिवस वाढत आहे. हिवाळ्यामुळे हवेच्या गुणवत्तेची पातळी आणखी घसरेल. प्रदूषणामुळे नागरिकांना अनेक आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागते.

नुकतेच याबाबत 'लोकल सर्कल'ने सर्वेक्षण केले आहे. वाढत्या प्रदुषणामुळे खराब वातावरणाचा परिणाम मुंबईतील पाचपैकी चार कुटुंबांवर होत आहे.मुंबईतील वाढत्या प्रदुषणामुळे नागरिकांमध्ये सर्दी, खोकला, डोळे चुरचुरणे, दमा, डोकेदुखी यांसारखे आजार होत असल्याचे या सर्वेक्षणातून स्पष्ट सांगण्यात आले आहे.

हे वातावरण आणखी खराब होणार असल्याने नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी आणि प्रदूषण टाळण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन करण्यात येत आहे. त्यातच अनेक सेलिब्रिटींनीही यावर पोस्ट केली आहे.

मराठमोळी अभिनेत्री केतकी माटेगावरकरने देखील यासंदर्भात पोस्ट शेअर केली आहे. तिनेही सोशल मिडियावर एक पोस्ट शेयर करत हवेच्या प्रदुषणावर भाष्य केले आहे. इतकच नाही तर पोस्टच्या शेवटी तिने मुंबई महानगरपालिकेला टॅग केलं.

"गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे, प्रदूषणात वाढ होत आहे! आपल्या परिसरातील लोकांना श्वसनाचे विकार, धुळीची ऍलर्जी, व्हायरल इन्फेक्शनचा त्रास होत आहे. मुंबईत सुरू असलेल्या साइट्स (बांधकाम) आणि इमारतींची काम करणाऱ्यांनी याबाबत खबरदारी घेणे आवश्यक आहे! जलकुंभांजवळ कोणताही कचरा फेकण्याआधी विचार करा आणि काळजी घ्या. एक जबाबदार नागरिक म्हणून या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष घालण्याची मुंबई महानगरपालिकेला विनंती करते"

सध्या केतकीच्या या पोस्टची सर्वत्र चर्चा होत आहे. नेटकरी तिच्या पोस्टला प्रतिक्रिया देत आहे. तर केतकीनं योग्य विषयावर भाष्य केल्यानं चाहते तिचं कौतुक करत आहेत. केतकीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती शेवटची ‘अंकुश’ चित्रपटात दिसली. या चित्रपटात दिपराजसोबत ती मुख्य भूमिकेत होती.

तर काही दिवसांपुर्वीच टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने मुंबईत आल्यानंतर हवेच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित केला होता. त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर विमानातील एक फोटो पोस्ट केले आहे, ज्यामध्ये हवेची गुणवत्ता किती वाईट आहे याबाबत लिहिले होते. मुंबईतील वाढत्या प्रदूषणाबाबत चिंता व्यक्त करत रोहित शर्माने लिहिले - 'मुंबई, हे काय झालं', लक्षात घ्या की, दिल्लीसह मुंबईतील हवेची गुणवत्ताही या मोसमात खराब झाली आहे.' त्यामुळे आता पुन्हा मुंबई हवामानाचा मुद्दा चर्चेत आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: भाजपचे उमेदवार विनोद शेलार आघाडीवर

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: कसबा विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे भाजपकडून असलेले उमेदवार हेमंत रासने यांची विजयाच्या दिशेने घौडदौड

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT