महाभारत या प्रसिद्ध मालिकेतील अभिनेते रसिक दवे(Rasik dave) यांचे वयाच्या ६५ व्या वर्षी निधन(Passed Away) झाले आहे. शुक्रवारी २९ जुलै रोजी रात्री आठ वाजता किडनी संबंधित आजाराशी झुंज देणाऱ्या रसिक दवे यांना अखेर मृत्यूनं गाठलं. रसिक दवे हे क्यों की सास भी कभी बहु थी मधील आरारारा..या संवादानं घराघरात प्रसिद्ध झालेल्या अभिनेत्री केतकी दवेचे पती होते. पतीच्या मृत्यूनंतर अभिनेत्री पू्र्ण कोलमडली आहे. तिनं पहिल्यांदाच मौन सोडत म्हटलं आहे की,''गेली काही वर्ष आमच्यासाठी खूप कठीण होती''. रसिक दवे यांनी आपल्या आजाराविषयी कधीच कुणाला काही सांगितले नव्हते.(Ketki Dave talks about her husband actor Rasik Dave who passed away on 29th July,2022)
एका इंग्रजी वेबसाईटशी केलेल्या संवादा दरम्यान केतकी दवे म्हणाल्या,''रसिकला कधीच कुणाला आपल्या आजाराविषयी सांगितलेलं आवडायचं नाही. म्हणूनआम्ही देखील कधीच कुणाला त्याविषयी काही सांगितले नाही. त्याला आपलं आयुष्य खाजगी ठेवलेलं आवडायचं. त्याला विश्वास होता की,सगळं ठीक होईल. पण आतमध्ये कुठेतरी त्याला जाणीव झाली होती की आता काहीच चांगलं होणार नाही. गेल्या काही दिवसांपासून ते मला सारखं म्हणायचे,कायम काम करत राहिलं पाहिजे. मला एका नाटकाची तयारी करायची होती. मी त्यांना म्हणाले की,सध्या मी काम करण्याच्या मनःस्थितीत नाहीय. पण ते मला म्हणाले, सतत काम करत राहायला हवं. कधीच काम करणं थांबवलं नाही पाहीजे''.
केतकी दवे पुढे म्हणाल्या,''ते जेव्हा आजारी होते तेव्हा देखील ते म्हणायचे,मी ठीक होईन. मी आशा सोडणार नाही. आज मी या कठीण परिस्थितीचा सामना करु शकते कारण मला माहीत आहे रसिक माझ्यासोबत कायम असतील. माझ्यासोबत माझं कुटुंब आहे,माझी मुलं,माझी आई,सासू सगळेच माझी ताकद आहेत. पण मी माझ्या पतीला खूप मिस करेन. जेव्हा आम्हाला कळलं रसिकच्या आजाराविषयी तेव्हा मी खूप रडले होते. पण माझी आई माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली''.
रसिक दवे यांच्यासोबतच्या पहिल्या भेटीविषयी बोलताना केतकी दवे म्हणाल्या,''आम्ही १९७९ मध्ये भेटलो. आमच्यात चांगली मैत्री झाली. एकमेकांना आम्ही मग पसंत करू लागलो. आणि १९८३ मध्ये लग्न केलं. रसिकने आयुष्य खूप मनापासून जगलं. मला नेहमीच काम करण्यासाठी प्रोत्साहन दिलं. ४० वर्ष रसिकसोबत आयुष्य जगले,तेही आनंदात, कारण रसिकला माहित होतं आयुष्य कसं जगायचं आहे''.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.