kgf 2 movies  esakal
मनोरंजन

काय सांगता 'अँग्री यंग मॅन'वर आधारित KGF 2? यशनं केला खुलासा

साऊथ सुपरस्टार यशचा केजीएफ 2 (KGF 2) हा येत्या शुक्रवारी प्रदर्शित होणार आहे.

युगंधर ताजणे

Tollywood Movies: साऊथ सुपरस्टार यशचा केजीएफ 2 (KGF 2) हा येत्या शुक्रवारी प्रदर्शित होणार आहे. टॉलीवूडच्या चाहत्यांना या चित्रपटाचे गेल्या तीन (Bollywood News) वर्षांपासून वेध लागले होते. अखेर केजीएफ 2 चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा आहे. केजीएफच्या अॅडव्हान्स बुकींगला गेल्या आठवड्यापासून सुरुवात झाली होती. (Bollywood Movies) त्यावरुन वातावरण निर्मिती व्हायला सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून टॉलीवूडच्या एकापेक्षा एक सरस चित्रपटांनी बॉलीवूडमध्ये खळबळ उडवून दिली आहे. त्यामुळे बॉलीवूडच्या गोटात अस्वस्थता पसरल्याचे दिसून आले आहे.त्यामुळेच की काय आता बॉलीवूडचे दिग्गज अभिनेते उघडपणे टॉलीवूडच्या चित्रपटांचे स्वागत करताना दिसत आहे.

भारतीय हिंदी चित्रपटांमध्ये 80 च्या दशकांत अँग्री यंग मॅनचा उदय झाला असे सांगितले जाते. त्यातून महानायक अमिताभ बच्चन यांनी सर्वसामान्य माणसांतील अस्वस्थता आणि राग पडद्यावर साकारली. त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. अमिताभ यांना मिळालेलं ग्लॅमर ही त्या अँग्री यंग मॅनची करामत आहे हेही अनेकांना माहिती आहे. गेल्या काही वर्षांपासून बॉलीवूडमध्ये हिरोइझम हा कमी होताना दिसतो आहे अशी खंत बॉलीवूडचा भाईजान सलमान खाननं यापूर्वी व्यक्त केली होती. त्यामुळे बॉलीवूडचे चित्रपट हे बॉक्स ऑफिसवर फारसे प्रभावी ठरत नसल्याचे सलमाननं म्हटलं होतं. त्यामुळे येत्या काळात पुन्हा एकदा बॉलीवूडला हिरोच्या भोवती केंद्रित झालेले चित्रपट तयार करावे लागतील. असे सलमाननं सुचवलं होतं.

काही दिवसांपासून टॉलीवूडच्या वेगवेगळ्या चित्रपटांनी बॉलीवूडवर कब्जा केल्याचे दिसून आले आहे. त्यात गेल्या वर्षी प्रदर्शित झालेला अथिरण, असुरन, मास्टर, बॉक्स ऑफिसवर कमालीचा यशस्वी झालेला पुष्पा, यावर्षी प्रदर्शित झालेले राधे शाम, आरआरआर आणि वल्लीमाय या चित्रपटांनी बॉलीवूडला काट्याची टक्कर दिली आहे. या चित्रपटांना टक्कर देणारा एकही बॉलीवूडचा चित्रपट नाही. आता तर यशचा केजीएफ 2 येत्या शुक्रवारी प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या चित्रपटाची तुलना अँग्री यंग मॅन अमिताभ यांच्या चित्रपटांशी केली जात आहे. सोशल मीडियावर हा ट्रेंड व्हाय़रल होताना दिसतो आहे. यासगळ्या परिस्थितीवर यशनं त्याच्या एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की, हा चित्रपट बऱ्य़ापैकी अमिताभ यांच्या 80 च्य़ा दशकातील वेगवेगळ्या कथानकांवर आधारित आहे. मात्र मला कोणत्याही चित्रपटांचा रिमेक तयार करण्यात काहीही रस नसल्याचे त्यानं यावेळी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aheri Assembly Election Results 2024 : बापाने केला लेकीचा पराभव! अहेरी मतदारसंघात धर्मरावबाबा आत्राम यांनी मारली बाजी

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: हा ऐतिहासिक विजय, जनतेचे आभार- शिंदे

khadakwasla Assembly Election 2024 Result Live: खडकवासलात भाजपचा विजयाचा चौकार, भीमराव तापकीर यांनी पुन्हा मारली बाजी

Rajan Naik Nalasopara Assembly Election 2024 Result : नालासोपाऱ्याचा गड भाजपचाच; राजन नाईक यांचा दणदणीत विजय

Dapoli Assembly Election 2024 Results : दापोलीत आमदार योगेश कदमांनी राखला गड; ठाकरे गटाच्या संजय कदमांचा केला पराभव

SCROLL FOR NEXT