'KGF' star Yash meets families of 3 fans electrocuted while installing a banner video viral Esakal
मनोरंजन

सुपरस्टारपलीकडचा संवेदनशील माणूस! 'KGF' स्टार यशने निधन झालेल्या चाहत्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन केले सांत्वन

यशने विजेच्या धक्क्याने मृत्यू झालेल्या तरुणांच्या कुटुंबाची भेट घेतली आणि शोक व्यक्त केला.

Vaishali Patil

KGF actor Yash's fans die of electrocution: दाक्षिणात्य सेलिब्रिटींच्या चाहत्यांची संख्या खुप जास्त आहे. ज्यात रजनीकांतपासून महेश बाबू आणि अल्लू अर्जुन अन् राम चरणपर्यंत सर्व कलाकारांचे चाहते त्यांना देवापेक्षा कमी लेखत नाहीत. वेळोवेळी चाहते आपलं प्रेम व्यक्त करत असतात. मात्र यावेळी काही दुर्दैवी घटनाही घडत असतात. तसंच काहीसं KGF स्टार यशच्या वाढदिवसानिमित्त घडलं आहे.

काल KGF स्टार यशने त्याचा 38 वा वाढदिवस साजरा केला होता. यशसोबतच त्याचे चाहतेही त्याचा वाढदिवस साजरा करताना दिसले. मात्र यावेळी अत्यंत वाईट घटना घडली.

सेलिब्रेशनची तयारीत असताना तीन चाहत्यांचा मृत्यू झाला. यशचा कट-आउट लावताना विजेचा धक्का लागून तीन चाहत्यांचा मृत्यू झाला. तर अन्य तीन जण गंभीर जखमी झाले होते. हा अपघात गदग जिल्ह्यातील लक्ष्मेश्वर तालुक्यातील सुरंगी गावात मध्यरात्री घडला होता.

त्यामुळे सर्व गावावर शोककळा पसरली होती. या वाईट बातमीने यशलाही धक्का बसला. तो त्या शोकग्रस्त कुटूंबाच्या भेटीसाठी सुरंगी गावात पोहोचला. तिथे यशने विजेच्या धक्क्याने मृत्यू झालेल्या तरुणांच्या कुटुंबाची भेट घेतली आणि शोक व्यक्त केला. यश प्रथम मृत चाहता मुरलीच्या घरी पोहोचला, जिथे त्याने त्याच्या पालकांची भेट घेतली आणि शोक व्यक्त केला.

यावेळी सांत्वनानंतर यश सांगितले की, 'कोविडमुळे मी माझा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय मी घेतला होता. चाहत्यांच्या कुटुंबासाठी शक्य असेल तितके मी करणार. चाहत्यांच्या पालकांसाठी मी येथे आलो आहे. कितीही नुकसान भरपाई दिली तरी त्यांची मुले परत येणार नाहीत.'

पुढे यश म्हणाली की, त्यांच्या कुटुंबाला जी काही गरज असेल ती मदत मी करेन. तसेच यशने त्याच्या चाहत्यांना काळजी घेण्याचे आवाहन केले आणि असं काहीही न करण्याचा सल्ला दिला.

गावात यश आल्याने तरुणांची गर्दी वाढण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी गावात अनेक ठिकाणी बॅरिकेड्स लावले होते. घटनास्थळी एसपी, डीवायएसपी आणि पाच सीपीआय यांच्यासह शंभरहून अधिक पोलीस उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Elections Results: राज्यात सत्ता स्थापनेसाठी बंडखोर ठरणार किंग मेकर! महाविकास आघाडीची रणनीती ठरली, काल मुंबईत काय घडलं?

AUS vs IND 1st Test: बुमराहने जिंकला टॉस! नितीश रेड्डी अन् हर्षित राणाचे भारताकडून पदार्पण; पाहा 'प्लेइंग-11'

Sakal Podcast: दहावी-बारावीच्या परीक्षांचं अंतिम वेळापत्रक जाहीर ते पुढचा मुख्यमंत्री देशमुखांच्या घरातलाच?

दहावी-बारावी बोर्डाचे ठरलं वेळापत्रक! यंदा परीक्षेचे सीसीटीव्हीत होणार रेकॉर्डिंग; निकालापर्यंत फुटेज साठविण्याचे केंद्रांना बंधन; केंद्रांवरील सुविधांची १५ डिसेंबरपर्यंत पडताळणी

Panchang 22 November: आजच्या दिवशी शुं शुक्राय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा

SCROLL FOR NEXT