jui gadkari shared emotional post on Khalapur irshalwadi landslide SAKAL
मनोरंजन

Khalapur landslide: 'कष्टं करुन मानाने जगतात ही ठाकरं', इर्शाळवाडीतील दुर्घटनेनंतर मराठी अभिनेत्रीची भावूक पोस्ट

Devendra Jadhav

Khalapur Irshalwadi Landslide: गुरुवारी सकाळपासून एका बातमीने महाराष्ट्रच नव्हे तर देशाचं मन सुन्न झालंय. ती म्हणजे रायगड खालापूर दुर्घटना.. खालापूरच्या इर्शाळवाडी येथे बुधवारी रात्री दरड कोसळल्याची माहिती समोर आली आहे. 30 कुटुंब मलब्याखाली अडकल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये अनेक लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मराठी अभिनेत्री जुई गडकरीने भावुक पोस्ट करुन आठवण सांगीतली आहे. (Jui Gadkari shared emotional post)

जुई गडकरीची भावुक पोस्ट

जुई गडकरीने सोशल मिडीयावर ती जेव्हा कुटूंबासोबत इर्शाळगडावर गेली होती तेव्हाचे फोटो पोस्ट केले आहेत. हे फोटो पोस्ट करुन जुई लिहीते..

"इर्शाळगडावर गेलो तेव्हाच्या काही आठवणी… सकाळपासुन इर्शाळवाडी वर दरड कोसळल्याची बातमी बघतेय आणि डोकं सुन्नं झालय… तिथल्या आऊच्या हातचा स्वयंपाक अजुनही आठवतोय… एव्हढ्या ऊंचावर असलेली ठाकरवाडी… विज नाही.. मेडीकल, जिवनावश्यक वस्तु असं वरती ठकरवाडीत काहीच नाही.. तरीही सदैव चेहरा हसरा… कसं काय जमतं त्यांना?

प्रत्येक वेळेला १-१.३० तास चढुन वर जाणं किती अवघड ए… पण तरीही कसलीही complaint नं करता खुप कष्टं करुन मानाने जगतात ही ठाकरं… माझ्या खुप जवळचा विषय आहे ठाकरं आणि ठाकरवाड्या… कितीतरी वाड्यांवर मी फिरलिये… त्यांच्या हातचं चविष्ठं जेवलिये… बातमी बघुन खुप वाईट वाटलं… सगळे सुखरुप असुदेत"

खालापूर इर्शाळवाडी दुर्घटना

रायगड जिल्ह्यातील खालापूरच्या इर्शाळवाडी येथे बुधवारी रात्री दरड कोसळल्याची माहिती समोर आली आहे.

30 कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती मिळत आहे. रायगड इर्शाळवाडी दुर्घटनेमध्ये आतापर्यंत दहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर 21 जण जखमी आहेत. या गावातील लोकसंख्या 228 आहे. 48 कुटुंबांचा ही वाडी होती. 57 लोकांना आतापर्यंत बाहेर काढलं आहे. त्यातील 60 ते 70 लोक गावाच्या बाहेर होते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bigg Boss Marathi 5 Winner LIVE Updates: गुलिगत धोकाने करून दाखवलं! सुरज चव्हाण ठरला 'बिग बॉस मराठी ५' चा विजेता

Viral: 'मला तुरुंगात पाठवा, माझ्याकडे...', व्यापारी GST कार्यालयात गेला, अधिकाऱ्यांसमोरच अर्धनग्न होत छेडलं आंदोलन, कारण काय?

Sports Bulletin 6th October 2024: भारतीय महिला संघाचा पाकिस्तानवर विजय ते रोहित शर्माला पत्नीसमोर तरुणीनं केलेलं प्रपोज

Bopdev Ghat Rape Case : बोपदेव घाट आत्याचार प्रकरणातील नराधम अद्यापही फरार; पोलिसांकडून २०० संशयितांची कसून चौकशी

Nashik Fraud Crime : वर्क फ्रॉम होम, शेअर मार्केट ट्रेडिंगचे आमिष भोवले; सायबर भामट्याने घातला 37 लाखांना गंडा

SCROLL FOR NEXT