Faisu And Khatron Ke Khiladi 12 Updates esakal
मनोरंजन

KKK 12 : 'खतरों के खिलाडी'मध्ये ट्विस्ट, वाईल्ड कार्डने स्पर्धक परतणार !

'खतरों के खिलाडी'मध्ये नवीन ट्विस्ट येणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

Khatron Ke Khiladi 12 Updates : 'खतरों के खिलाडी 12' टीआरपीच्या टॉप लिस्टमध्ये कायम आहे. या दरम्यान, एक धक्कादायक एलिमिनेशन झाले आणि फैजू बाहेर पडला. फैजूची आतापर्यंतची कामगिरी उत्कृष्ट होती. रोहित शेट्टी (Rohit Shetty) नेहमीच त्याच्या धाडसाचे कौतुक करताना दिसला. रविवारी प्रसारित झालेल्या एपिसोडमधून फैजूच बाहेर पडल्याने चाहत्यांना धक्का बसला आहे.

मात्र, निर्मात्यांनीही आनंदाची बातमी दिली आहे. पुढील आठवड्यात तो वाईल्ड कार्डद्वारे परत येईल. एवढेच नाही तर शोच्या आणखी एका लोकप्रिय स्पर्धकाला आणखी एक संधी दिली जाणार आहे.

रविवारच्या एपिसोडमध्ये पुढील आठवड्याचा प्रोमो दाखवण्यात आला होता, ज्यामध्ये फैझू आणि सृती झा यांची एंट्री होते. २१ ऑगस्ट रोजी प्रसारित झालेल्या एपिसोडमध्ये सृतीला बाहेर काढण्यात आले होते.

ती टीव्ही विश्वातील आवडती सून आहे. अशा परिस्थितीत तिची फॅन फॉलोइंगही मोठी आहे. चाहत्यांची काळजी घेत फैजू आणि सृतीला आणखी एक संधी देण्यात आली आहे.

इतर स्पर्धकांची प्रतिक्रिया काय?

समोर आलेल्या प्रोमोमध्ये फैजू म्हणतो, 'मला आणखी एक संधी मिळाली आहे. मी आणखी मेहनत करेल. त्याच वेळी सृती 'करेंगे तो होगा ही' म्हणते. तिला पुन्हा पाहाताच शोच्या इतर अनेक स्पर्धकांचे चेहरे पडतात. निशांत भट म्हणतो, 'दोघेही धोका बनल्यानंतर परत आले आहेत.' तर तुषार कालिया म्हणाला, 'दोघेही खूप मजबूत स्पर्धक आहेत. खूप मजा येणार आहे.'

कोणते स्पर्धक बेदखल झाले

'खतरों के खिलाडी 12' मध्ये रुबीना दिलैक (Rubina Dilaik), कनिका मान, मोहित मलिक, निशांत भट, तुषार कालिया, राजीव अदातिया, प्रतीक सहजपाल, जन्नत जुबैर हे सध्या स्पर्धेत आहेत. आतापर्यंत एरिका पॅकार्ड, अनेरी वजानी, शिवांगी जोशी, चेतना पांडे, सृती झा आणि फैजू यांना शोमधून बाहेर काढण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT