Khatron Ke Khiladi 13: भारतातील स्टंट बेस्ड शो पैकी एक मोठा आणि लोकप्रिय शो म्हणजे खतरों के खिलाडी' . या शो चा १३ वा सीझन सध्या सुरु आहे. दिग्दर्शक रोहित शेट्टी होस्ट करत असलेल्या या शो चा मोठा चाहतावर्ग खुप तगडा आहे.
हा शो पाहायला आता ते सगळेच खूप उत्सूक आहेत. या शो चे शुटिंग सध्या दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊनमध्ये सुरु आहे. तर चाहते या शो विषयी अपडेट जाणुन घेण्यासाठी खुप उत्सूक असतात.
खतरों के खिलाडी 13 चं अर्ध्यापेक्षा जास्त शूटिंग पूर्ण झाले आहे. जुलैमध्ये कलर्स टीव्हीवर या शोचा प्रीमियर होणार आहे. खतरों के खिलाडी 13 मध्ये स्पर्धकांबद्दल आणखी एक माहीती समोर आली आहे.
(khatron ke khiladi 13 sheezan khan)
अलीकडेच दिव्यांका त्रिपाठी आणि हिना खान, फैजल शेख हे काही दिवसांपूर्वी 'खतरों के खिलाडी सीझन 13' चा भाग बनले होते. त्यात काही स्पर्धक या शोमधून बाहेरही गेले आहेत.
रुही चतुर्वेदी, अंजली आनंद, डेजी शाह, रोहित रॉय हे स्पर्धक बाहेर पडले होते आता त्यातच आणखी एक स्टाँग स्पर्धक शो मधुन बाहेर पडल्याचे सांगण्यात येत आहे.
मिडिया रिपोस्टनुसार आता शीजान खान या शोमधून पडला असल्याचा दावा करण्यात येत आहे.
मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात येत आहे की, एलिमिनेशन स्टंट पूर्ण न करू शकल्याने शीझान खान शो मधुन बाहेर झाला आहे.
शीजान खान हा या शोचा एक मजबूत स्पर्धक होता. आता त्याच्या जाण्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
तुनिशा शर्माच्या मृत्यूनंतर शिझान खान बराच वादात अडकला होता. तुरुगांतुन जामिनावर बाहेर आलेल्या शिझानला खतरों के खिलाडी 13 ने संधी दिली होती.
आता या शो ला त्याचे टॉप आठ स्पर्धक मिळाले आहे. यामध्ये शिव ठाकरे, डिनो जेम्स, अरिजित तनेजा, ऐश्वर्या शर्मा, अर्चना गौतम, सौंदस मौफकीर, नायरा बॅनर्जी आणि रश्मीत कौर यांचा सामावेश आहे. आता सर्व स्पर्धक पुर्ण शक्तीने हा शो जिंकण्याचा प्रयत्न करत आहे.
त्यातच हा शो शिव ठाकरेच जिंकणार असा विश्वासही प्रेक्षकांना आहे. हा शो 15 जुलैपासून सुरू होत असून रात्री 9.00 वाजता कलर्सवर प्रसारित होणार आहे. ज्यांची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.