Khruchi Marathi Movie Teaser Viral social esakal
मनोरंजन

Khurchi Teaser : 'आता खुर्ची आपलीच हाय'! राकेश बापटचा वेगळाच स्वॅग

युगंधर ताजणे

Khruchi Marathi Movie Teaser Viral social : मराठी मनोरंजन विश्वामध्ये सध्या एका चित्रपटाची मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहे. गेल्या काही दिवसांपासून खुर्ची या आगळ्या वेगळ्या विषयावरील चित्रपटानं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. "जिथे माझ्या कहाणीचा शेवट झाला तिथूनच एका नवीन कहाणीला सुरुवात करण्यासाठी मी राजवीर देसाई पुन्हा आलोय, सत्तेसाठी, खुर्चीसाठी आणि माझ्या अंगात सळसळणाऱ्या रक्तासाठी" या दमदार संवादाने सुरु होणाऱ्या टीझरने प्रेक्षकांना प्रतिक्रिया देण्यास भाग पाडले आहे.

१२ जानेवारी २०२४ला 'खुर्ची' या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर वेगळं वादळ घोंगावताना दिसणार आहे. 'खुर्ची' या चित्रपटाची सर्वत्र हवा असलेली पाहायला मिळत आहे. अशातच चित्रपटाच्या टीझरला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. सत्ता, खुर्ची, खून, मारामाऱ्या आणि रक्त या सगळ्याच्या अवतीभोवती फिरणार कथानक प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. टीझरमध्ये पाहायला मिळाल्याप्रमाणे नेमकं सत्तेच्या खुर्चीवर कोण बाजी मारणार हे चित्रपटगृहातच कळेल.

या चित्रपटात राकेश बापट, अक्षय वाघमारे,आर्यन हगवणे, सुरेश विश्वकर्मा, महेश घाग, अभिनेत्री प्रीतम कागणे, कल्याणी नंदकिशोर, श्रेया पासलकर या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. टीझरमध्ये राकेश बापट, अक्षय वाघमारे, व बालकलाकार आर्यन हगवणे या कलाकारांनी त्यांच्या अभिनयाने राडाच घातला आहे.

अभिनेता राकेश बापट चित्रपटाबाबत बोलताना, "नुकताच चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला आहे. टिझर पाहून तुम्हाला कल्पना आली असेल की नक्की आम्ही काय व कशा प्रकारचा राडा घातला आहे. एकूणच चित्रपट करताना खूप मज्जा आली" असं तो म्हणाला. तर अभिनेता अक्षय वाघमारे चित्रपटाबाबत बोलताना, "चित्रपट प्रदर्शनापूर्वीच चित्रपटाची झालेली हवा पाहून मी अचंबित झालो आहे.

संतोष कुसुम हगवणे प्रस्तुत 'आराध्या मोशन फिल्म्स',’ आणि 'योग आशा फिल्म्स' निर्मित या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा संतोष कुसुम हगवणे, योगिता गवळी आणि प्रदीप नत्थीसिंग नागर यांनी बरोबरीने सांभाळली आहे. डॉ. अमित बैरागी आणि आतिश अंकुश जवळकर यांची सहनिर्मिती असून राजकारणाचे विविध रंग या चित्रपटात रेखाटण्यात आले आहे.

खुर्चीसाठीची लढाई नेमकं कोण लढणार? चित्रपटातील सत्तेसाठीच्या या लढाईत खुर्ची कोणाला मिळणार? हे पाहणं रंजक ठरणार. 'खुर्ची’ हा जबरदस्त ऍक्शनचा भरणा असलेला चित्रपट येत्या नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात म्हणजेच १२ जानेवारी २०२४ मध्ये प्रदर्शित होईल. ‘खुर्ची’चं राजकारण पाहण्यासाठी प्रेक्षकांना आणखी काही काळ वाट बघावी लागणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महामंडळाचा प्रसाद फक्त शिंदे गटाला? हेमंत पाटलांसह संजय शिरसाटांवर नवी जबाबदारी; नाराज आमदारांचे राजकीय पुनर्वसन

Kush Maini: धक्कादायक! भारताचा फॉर्म्युला-2 रेसर अपघातादरम्यान थोडक्यात बचावला, दुर्घटनेदरम्यानचा Video आला समोर

Manchar News : पुणे-नाशिक औद्योगिक राष्ट्रीय महामार्ग होणार रद्द; सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील

Uruli Kanchan Crime : उरुळी कांचन गोळीबार प्रकरण बापू उर्फ दशरथ विठ्ठल शितोळेंसह पाच‌ जणांना पोलिस कोठडी

Noise Pollution : ध्वनी प्रदूषण नियमाचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांवर करण्यात येणार कारवाई; पोलिस आयुक्त अमितेश कुमार

SCROLL FOR NEXT