Khupte Tithe Gupte avdhoot gupte marathi show coming soon zee marathi sakal
मनोरंजन

Khupte Tithe Gupte: आता खुपणार नाही तर टोचणार! कारण अवधूत येतोय 'खुपते ते गुप्ते' घेऊन..

तो पुन्हा येतो आहे! त्यामुळे आता धम्माल येणार..

नीलेश अडसूळ

Avdhoot Gupte: जय जय महाराष्ट्र माझा म्हणत पारंपरिक संगीत आणि फ्यूजन यांचं उत्तम समीकरण साधारणा गायक म्हणजे अवधूत गुप्ते. केवळ गायकच नाही तर संगीत दिग्दर्शक, चित्रपट दिग्दर्शक, निर्माता आणि एक उत्तम चौकस कलाकार म्हणून अवधूत गुप्तेकडे पाहिले जाते.

अवधूतचं गाणं आलं आणि आपण नाचलो नाही असं क्वचितच होतं. नुकतच त्याने मनसे पक्षाचं नवं गाणं गायलं आणि सर्वत्र त्याची चर्चा सुरू झाली. लवकरच अवधूत नवा चित्रपट घेऊन येत असल्याचीही चर्चा आहे. अशातच त्याच्या आणखी एका 'शो'ची नुकतीच घोषणा झाली आहे. या शो ने आता मोठी चर्चा रंगणार आहे.

(Khupte Tithe Gupte avdhoot gupte marathi show coming soon zee marathi )

प्रेक्षकांकडून मिळत असलेल्या प्रतिसादाने आणि प्रेमामुळे झी मराठीचा मंच प्रेक्षकांच्या आनंदासाठी सतत काही ना काही नवीन, दर्जेदार सादर करतच असतो. पुन्हा एकदा झी मराठी बऱ्याच काळानंतर म्हणजेच जवळपास १० वर्षानंतर एक जबरदस्त व अफलातून कार्यक्रम आपल्या भेटीस आणत आहे आणि तो बहूचर्चित कार्यक्रम म्हणजे 'खुपते तिथे गुप्ते'. परत एकदा तो येणार आणि सगळ्यांची गुपित उलगडणार आहे.

नावावरून तर प्रेक्षकांच्या लक्षात आलच असेल की ती खुपणारी गोष्ट बेमालूमपणे व खुबीने समोर आणणार आहे ते आपल्या सर्वांचे अत्यंत लाडके अवधूत गुप्ते.

'खुपते तिथे गुप्ते'च हे पर्व सर्वार्थाने वेगळं असणार आहे कारण, या पर्वाच खास आकर्षण असणार आहे ती म्हणजे एक खास ‘खुर्ची’ हो खुर्ची जिच्यासाठी सगळीकडे चढाओढ पाहायला मिळतेय, मग ते नॊकरीमध्ये असो, कॉर्पोरेट जग असो किंवा मग राजकारण.

ही खुर्ची सर्वार्थानं वेगळी असणार आहे कारण, या खुर्चीवर जे सेलिब्रिटी, राजकारणी किंवा मान्यवर बसणार आहेत त्यांना गुप्ते असे काही प्रश्न विचारणार आहेत जे त्यांना खुपणार नाही तर टोचणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT