Kiara Advani Sidharth Malhotra takes a dip in the ocean as they celebrate kiara 31st birthday  SAKAL
मनोरंजन

Kiara - Siddharth: निळाशार समुद्र आणि ते दोघं.. कियाराने नवरा सिद्धार्थसोबत केलं वाढदिवसाचं अनोखं सेलिब्रेशन

Devendra Jadhav

Kiara Advani- Siddharth Malhotra News: बॉलीवुडमधलं सध्या सर्वाधिक चर्चेत असलेलं कपल म्हणजे सिद्धार्थ - कियारा. सिद्धार्थ - कियारा हे अनेकदा इव्हेंट आणि पार्टीमध्ये एकत्र दिसतात.

कियारा अडवाणीचा नुकताच सोमवारी वाढदिवस झाला. त्यानिमित्ताने सिद्धार्थ - कियाराचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झालाय. या व्हिडीओत कियारा - सिद्धार्थ समुद्रकिनारी मनसोक्त मजा करताना दिसत आहेत.

निळ्याशार समुद्रात मजा करताना सिद्धार्थ - कियारा

कियारा अडवाणीने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​समुद्रात उडी मारताना दिसत आहेत. अभिनेत्रीने काळ्या रंगाचा मोनोकिनी स्वीम ड्रेस परिधान केलाय. या ड्रेसची किंमत सुमारे 65 हजार रुपये आहे. समुद्रात उडी घेतल्यावर या दोघांनी ओरडून आनंद साजरा केला. या व्हिडिओला आतापर्यंत 25 लाखांहून अधिक लोकांनी पसंती दर्शवली आहे.

लग्नानंतर कियाराचा पहिला वाढदिवस

सिद्धार्थ मल्होत्राशी लग्न झाल्यानंतर कियाराचा हा पहिला वाढदिवस होता. सुंदर लोकेशनवर, निळ्याशार समुद्रकिनारी दोघांनी एकमेकांच्या सहवासाचा आनंद लुटला. हा व्हिडिओ शेअर करत कियाराने कॅप्शनमध्ये लिहिलंय की, 'हॅप्पी बर्थडे टू मी.'

सिद्धार्श - कियाराचं वर्कफ्रंट

सिद्धार्थ - कियारा या नवरा - बायकोच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर.. सिद्धार्थ करण जोहरच्या आगामी 'योद्धा' चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय तो रोहीत शेट्टीच्या आगामी 'इंडियन पोलिस फोर्स' या वेबसिरीजच्या माध्यमातुन डिजिटल डेब्यू करणार आहे.

कियाराबद्दल बोलायचे झाले.. तर ती अलीकडेच सत्यप्रेम की कथा या सिनेमात झळकली. या सिनेमाने बॉक्स ऑफीसवर चांगली कामगिरी केली. याशिवाय कियारा आता राम चरणसोबत आगामी चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय हृतिक रोशन आणि Jr NTR ची भुमिका असलेल्या 'वॉर 2' या अॅक्शन-थ्रिलर चित्रपटात कियारा झळकणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RG Kar Doctors Strike Down : कोलकात्यातील डॉक्टरांचा संप अखेर मागे! तरीही आरजी कर कॉलेजच्या डॉक्टरांनी सरकारला दिला इशारा

IND vs BAN: विराट कोहलीने सर्वांसमोर कुलदीप यादवला मैदानात खेचत नेलं, ऋषभ पंतनेही दिली साथ, पाहा Video

Donald Trump Third Attack: ट्रम्प यांच्यावर पुन्हा जीवघेणा हल्ला? अॅरिझोना इथल्या निवडणूक रॅलीत नेमकं काय घडलं?

Tirupati Laddu Controversy: तिरुपती देवस्थानच्या लाडूमध्ये चरबीच! NDDB CALF लॅबच्या रिपोर्टने खळबळ; विनोद तावडेंनीही केलं ट्वीट

state co-operative bank: राज्य सहकारी बँक कर्मचाऱ्यांना आजीवन पेन्शन मिळणार; 'एवढ्या' कर्मचाऱ्यांना होणार फायदा

SCROLL FOR NEXT