Kiccha Sudeep's Vikrant Rona release and review Google
मनोरंजन

Kiccha Sudeep च्या रहस्यमय 'विक्रांत रोना'चं गणित फसलं? वाचा Review

पुष्पा, RRR, KGF2, विक्रम सारख्या सुपरहिट सिनेमांनंतर सुपरस्टार किच्चा सुदीपच्या विक्रांत रोनानं सिनेमागृहात एन्ट्री केली आहे.

प्रणाली मोरे

सध्या सिल्व्हर स्क्रीनवर साऊथच्या सिनेमांचा बोलबाला आहे. पुष्पा, RRR, KGF2, विक्रम सारख्या सुपरहिट सिनेमांनंतर सुपरस्टार किच्चा सुदीपच्या(Kiccha Sudeep) विक्रांत रोनानं (Vikrant Rona) सिनेमागृहात एन्ट्री केली आहे. सिनेमा रिलीज आधीपासूनच बराच चर्चेत पहायला मिळाला होता. आता रिलीजनंतर तर या सिनेमाची दणक्यात चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. चला जाणून घ्या सिनेमा पाहिल्यावर काय म्हणालं पब्लिक?(Kiccha Sudeep's Vikrant Rona release and review)

या सिनेमाच्या बाबतीत लोकांमध्ये चांगलीच क्रेझ पहायला मिळाली. सोशल मीडियावर तर लोकांनी या सिनेमाला पाच स्टार देऊन टाकलेत. किच्चा सुदीपचे चाहते तर या सिनेमाच्या रिलीजला एखाद्या उत्सवासारखं सेलिब्रेट करताना दिसत आहेत. भारताच्या बाहेरही सिनेमा प्रदर्शित झालेला आहे. ट्वीटरवर जर्मन प्रेक्षकांनीही सिनेमाचा रिव्ह्यू केलेला दिसून आला. सिनेमात जॅकलिन फर्नांडीसही किच्चा सुदीपसोबत आहे. सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतरच याविषयी चांगली चर्चा कानावर पडली होती. हा सिनेमा तब्बल ५ भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे.

किच्चा सुदीपच्या विक्रांत रोना सिनेमात आपल्याला थ्रिल, अॅक्शन,ड्रामा आणि सोबत मिस्ट्रीचा जबरदस्त तडका पहायला मिळेल. सिनेमाच्या कथेविषयी बोलायचं झालं तर याची गोष्ट कमरट्टू गावातून सुरू होते. या गावातील लोकांचा एकामागून एक मृत्यू होत असतो. यामुळे बोललं जातं की गावात ब्रम्हराक्षसाचा वास आहे. सिनेमात एका विहिरीचा एक सीन दाखवलाय,जिथे एका पोलिसाचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत मिळतो. बस्स, त्याच सीनला होते किच्चा सुदीपची एन्ट्री. त्यानंतर लहान मुलांच्या मृत्यूची मालिका सुरु झाल्याचं दाखवलं आहे. गावातच किच्चाची भेट लंडनहून आलेल्या संजू नावाच्या मुलाशी आणि एका शाळेच्या हेडमास्तरांशी होते. याच हेडमास्तरांच्या शाळेतील मुलं एका मागून एक मृत्यूमुखी पडताना दाखवलं आहे. यानंतर मग सुरु होतो विक्रांत रोनाचा या रहस्यामागचा शोध घेण्याचा तपास.

सिनेमात एका अशा कुटुंबाची गोष्ट दाखवली आहे,ज्याच्यावर भूतनाथ मंदीरात चोरी करण्याचा आरोप लावला गेलेला असतो. गाववाले त्या कुटुंबाला खूप मारतात,त्यानंतर ते कुटुंब सबंध गावाला शाप देतं की ज्यांनी कोणी त्यांच्यावर अन्याय केला आहे,त्यांचा वंश संपून जाईल. सिनेमा शेवटपर्यंत याच कुटुंबाच्या अवतीभोवती फिरताना दाखवला गेला आहे. कथेत अनेकदा भावूक क्षणही येतात, जेव्हा अभिनेता किच्चा सुदीपच्या मुलीचा मृत्यू देखील होतो. असो, या खुनांच्या मालिकेच्या मागे कोण आहे आणि त्याच्या पर्यंत विक्रात रोना कसा पोहोचतो हे पाहण्यासाठी मात्र आपल्याला सिनेमागृहातच जावं लागेल.

या सिनेमाची थीम पूर्ण डार्क आहे. यामुळे कदाचित प्रेक्षक थोडे कंटाळण्याची शक्यता आहे. संपूर्ण सिनेमात जंगल आणि पाऊसच जास्त दाखवला गेला आहे. त्यामुळे सिनेमा कलरफूल नसणं कदाचित त्याच्यासाठी नकारात्मक बाजू ठरू शकते. हा सिनेमा 3D देखील आहे, पण 3D इफेक्ट खूप कमी वाटतो. पण सिनेमात VFX तंत्र खूप चांगले वापरल्यामुळे ते थोडी मजा आणतंय सिनेमा पाहताना. सिनेमाच्या गाण्यांची जादू मात्र फेल ठरली आहे.

सिनेमा पाहिल्यावर एक गोष्ट मात्र लक्षात येईल ती म्हणजे किच्चा सुदीपनं सलमानला कॉपी केल्याची. आता सलमान सिनेमाचा प्रेझेंटर असल्यामुळे कदाचित तो इफेक्ट असेल बहुधा. नीता अशोकनं या सिनेमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. पण तिचा अभिनय ठीक-ठाक वाटला. जॅकलिन फर्नांडीसनं आपल्या भूमिकेसाठी चांगली मेहनत घेतल्याचं दिसलं. इतरही सर्व कलाकारांच्या भूमिका सिनेमाचं रहस्य टिकवण्यात मदत करताना दिसतात. पण सिनेमातील हे रहस्य मनोरंजन करण्यात मात्र कमी पडलंय. याचा परिणाम सिनेमाच्या बॉक्सऑफिस कलेक्शनवर होऊ शकतो हे मात्र नक्की.

या सिनेमाचे सिनेमॅटोग्राफर विल्यम डेव्हिड आहेत,ज्यांनी सिनेमाला आपल्या कॅमेऱ्याच्या जादूनं एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे. विक्रांत रोना हा मूळचा कन्नड सिनेमा आहे. ९५ करोडच्या बजेटमध्ये बनलेल्या या सिनेमाची टक्कर बॉलीवूडच्या एक व्हिलन रिटर्न्स सोबत होईल. पुष्पा, RRR, KGF2, विक्रम सारख्या सुपरहिट सिनेमांनंतर सुपरस्टार किच्चा सुदीपचा विक्रांत रोना साऊथची विजयी मालिका कायम राखेल अशी आशा थोडी धुसर वाटत आहे. पण आठवड्याच्या धकाधकीतून थोडं रिलॅक्स होण्यासाठी विक्रांत रोना पाहायला आपण नक्कीच जाऊ शकता. पूर्ण निराशा तर होणार नाही पण जास्त आशा घेऊनही आपणं सिनेमा पाहायला गेलात नाही तर उत्तम.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अमित ठाकरेंचा पराभव निश्चित, चौदाव्या फेरी अंती तिसऱ्या स्थानी

Electronic Voting Machine : EVM मशीनवर कशी मोजली जातात मते? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Atul Bhatkhalkar Won Kandivali East Assembly Election : कांदिवली पूर्व विधानसभेत बीजेपीच्या अतुल भातखळकरांची विजयी हॅट्रिक !

Maharashtra next CM: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? 'निकाला'नंतर तावडेंची बदलली भाषा, कोणाला दिलं विजयाचं क्रेडिट?

Kagal Assembly Election Results 2024 : मुश्रीफांनी समरजित घाटगेंचा केला टप्प्यात कार्यक्रम; कागलमध्ये लगावला 'विजयी षटकार'

SCROLL FOR NEXT