Kiran Abbavaram And Rahasya Gorak esakal
मनोरंजन

Kiran Abbavaram And Rahasya Gorak: एकाच सिनेमातून पदार्पण करणाऱ्या सेलिब्रिटी जोडप्याने गुपचूप उरकला साखरपुडा; पाहा फोटो

priyanka kulkarni

Kiran Abbavaram And Rahasya Gorak: सिनेसृष्टीत सध्या सेलिब्रिटींची लगीनघाई सुरू आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री रकुल प्रीत सिंह (Rakul Preet Singh) आणि अभिनेता जॅकी भगनानी (Jackky Bhagnani) यांचा विवाह सोहळा पार पडला. तर आता लवकरच पुलकित सम्राट (Pulkit Samrat) आणि क्रिती खरबंदा (Kriti Kharbanda) हे लग्नगाठ बांधणार आहेत. अशातच आता आणखी एका सेलिब्रिटी जोडप्यानं गुपचूप साखरपुडा उरकला आहे. अभिनेता किरण अब्बावरम (Kiran Abbavaram) आणि अभिनेत्री रहस्या गोरक (Rahasya Gorak) यांचा साखरपुडा पार पडला आहे. त्यांच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

चार वर्षांपासून एकमेकांना करत होते डेट

किरण अब्बावरम आणि रहस्या गोरक यांनी 2019 मध्ये रिलीज झालेला राजा वारू राणी गारू या तेलुगु चित्रपटातून पदार्पण केले. 2019 पासूनच किरण आणि रहस्या हे एकमेकांना डेटिंग करत होते. बुधवारी किरण आणि रहस्य यांचा साखरपुडा पार पडला.

हैदराबादमध्ये पार पडला साखरपुडा

हैदराबादच्या एका रिसॉर्टमध्ये किरण आणि रहस्या यांचा साखरपुडा धुमधडाक्यात पार पडला. साखरपुड्यासाठी किरण आणि रहस्या यांनी खास लूक केला होता. किरणनं पिंक कलरचा आऊटफिट परिधान केला होता तर रहस्यनं ऑलिव्ह ग्रीन कलरची साडी नेसली होती.

किरण आणि रहस्या कधी बांधणार लग्नगाठ?

किरणनं एसई कल्याणमंडपम, समथमे, मीटर आणि नियम रंजन यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. किरण आणि रहस्या ऑगस्टमध्ये लग्नबंधनात अडकणार आहेत, ते डेस्टिनेशन वेडिंग करणार आहेत, असंही म्हटलं जात आहे.

किरण आणि रहस्याचे चित्रपट

किरण हा सध्या रुक्षर धिल्लनसोबत एका चित्रपटात काम करत आहे. तर रहस्यानं 2021 मध्ये शरबत या तमिळ चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. त्यानंतर तिने कोणताही नवीन प्रोजेक्ट साइन केलेला नाही. किरण आणि रहस्याच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident Video: मनपाचा ट्रक पडला २५ फूट खड्ड्यात..! पुण्यातल्या सिटी पोस्ट परिसरातील विचित्र घटना

IND vs BAN 1st Test : Virat Kohli वर रोहित वैतागला; 'तो' एक निर्णय ज्याने अम्पायरही चकित झाले

Latest Marathi News Updates : तारापूर एमआयडीसी कंपनीमध्ये भीषण स्फोट! पाच ते सहा जण जखमी

IND vs BAN Test, 2nd Day: गोलंदाजांमुळे पहिल्या कसोटीत भारताने वर्चस्व गाजवले, पण Rohit - Virat च्या अपयशाने टेंशन वाढवले

swami avimukteshwaranand: शंकराचार्य म्हणतात, ''जिन्ना बरोबरच होते!'' पाकिस्तानच्या संस्थापकांशी का झालं एकमत?

SCROLL FOR NEXT