मुंबई - मुलगी झाली हो या मालिकेतून किरण मानेंना (Kiran Mane) काढून टाकल्यानंतर स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीने एक निवेदन प्रसिद्ध केलं. यात किरण माने यांना महिला सहकलाकारांशी गैरवर्तन केल्यानं काढून टाकल्याचं सांगण्यात आलं. त्याआधी दिग्दर्शकांसह टीमनेही किरण माने यांना तीन वेळा समज दिल्याचं आणि तरीही वर्तन न सुधारल्यानं काढल्याचं सांगितलं होतं. शिवाय मालिकेतील कलाकार सविता मालपेकर (Savita Malpekar) यांनीही ते टोमणे मारतात आणि वागणं चांगलं नव्हतं असं म्हटलं होतं. आता यावर किरण मानेंच्या बाजुने इतर सहकलाकार एकवटले आहेत. त्यांनी स्पष्टपणे किरण माने हे एक चांगले कलाकार आहेत आणि त्यांचे सेटवरचे वर्तनही चांगले असल्याचं म्हटलं आहे. राज्याचे मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी या सहकलाकारांचे व्हिडिओ शेअर केले आहेत.
कल्याणी केळकर (Kalyani Kelkar) यांनीही किरण माने यांच्या वागणुकीबद्दल सांगताना म्हटलं की, मला सांगायला काहीच अडचण नाही. एक व्यक्ती, सहकलाकार म्हणून ते उत्तम आहेत. त्यांचं सेटवरचं वागणंही अतिशय चांगलं आहे. सहकलाकाराशी समजून घेणं, चांगल्या गोष्टी सांगणं ते करतात. एक स्त्री म्हणून सव्वा वर्षात त्यांनी माझ्याशी कोणतीही वाईट वर्तणूक झालेली नाही. त्यांच्या बोलण्यातून वागण्यातून कधीच झाली नाही. मला उत्तम व्यक्ती आणि सह कलाकार वाटतात असं कल्याणी यांनी सांगितलं. कल्याणी केळकर या मुलगी झाली हो मालिकेत आत्याची भूमिका साकारतात.
आर्याची भूमिका करणाऱ्या श्वेता अंबीकर (Shweta Ambikar) यांनीही किरण मानेंचं वर्तन सेटवर चांगलंच होतं असं म्हटलं आहे. तसंच त्या म्हणाल्या की, माणूस म्हणून ते खूप चांगले आहेत. सह कलाकार म्हणूनही उत्तम आहेत. पहिल्या दिवसापासून गेली दीड वर्ष झालं काम करतेय. मी त्यांना समोर कधीच शिवी किंवा अपशब्द बोलताना पाहिलं नाही असंही श्वेता अंबीकर यांनी सांगितलं.
मुलगी झाली हो मालिकेत विलास पाटील यांच्या अक्षरा या मुलीची भूमिका करणारी शितल गीते (Shital Gite) हिनेही किरण मानेंबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. मी मुलीची भूमिका करते. त्या भूमिकेनुसार बाबांचाच आदर देते. तो आदर असाही कोणीच देत नाही, जर त्यांची वागणूक वाईट असती तर मी आदर कधीच दिला नसता. माझ्याशी त्यांची वागणूक चांगली आहे. त्यांनी माझ्यासमोर किंवा मला कधीच वाईट वागणूक केली नाही आणि टोमणेही मारले नाहीत. माझ्याशी वाईट वर्तणूक केलेली नाही. त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळालं आहे आणि इथून पुढेही शिकायला मिळेल असंही कलाकारांनी म्हटलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.